आलापुझा (केरळ), 4 जुलै : Coronavirus च्या काळात प्रवासाचे कोणाला कसे अनुभव येतील सांगता येत नाही. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगची काळजी असते. पण एका भारतीय तरुणाला उलट अनुभव आला. केरळच्या अलापुझा शहरात राहणाऱ्या प्रताप पिल्लई याने आयुष्यभर विसरणार नाही, असा एक विमानप्रवास केला. एखादं भलं मोठं खासगी विमान असावं आणि दिमतीला अनेक क्रू मेंमर्स फक्त आपली सरबराई करायला असावेत, असं वाटत असेलही. पण तसं ध्यानीमनी नसताना या प्रताप पिल्लईंना अनुभवायला मिळालं. या एकट्या माणसासाठी विमान जर्मनीतल्या फ्रँकफर्टहून सिंगापूरकडे उडलं.
प्रताप मूळचे अलापुझा शहरातले आहेत. मरीन इंडस्ट्रीशी संबंधित काम ते करतात. कामानिमित्त सिंगापूरहून ते जर्मनीला गेले होते. पण कोविडमुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यांना पुन्हा भारतात यायला संधीच मिळाली नाही. ते जर्मनीतच अडकून पडले.
वंदे भारत योजनेअंतर्गत त्यांनी भारतात परतायचा प्रयत्न केला. पण दिल्लीपर्यंतच फ्लाइट असल्याने पुन्हा केरळकडे कसं जाणार हा प्रश्न होताच. त्याऐवजी त्यांनी सिंगापूरला कामाच्या ठिकाणी परतायचं ठरवलं. जर्मनीची विमानसेवा सुरू होताच 14 जूनला त्यांनी तिकिट काढलं. विमानतळावर जाईपर्यंत काय विमानात बसेपर्यंत त्यांना पुढच्या अनुभवाची काहीच कल्पना नव्हती. पण विमानात शिरताच त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्याशिवाय कुणीच प्रवासी विमानात नाहीत.
प्रताप यांच्याखेरीज ज्या प्रवाशांनी या विमानाचं तिकिट बुक केलं होतं, त्या सर्वांनी ते कॅन्सल केलं होतं. त्यामुळे ते एकटेच प्रवासी राहिली होते. त्यांच्यासाठी हे मोठं विमान उडवण्यात आलं. प्रताप यांच्याखेरीज विमानात 10 क्रू मेंबर मात्र होते.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.