JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पॉर्न पाहण्याने मिळतो क्षणिक आनंद; पण तसले VIDEO पाहण्याआधी हे वाचा, आजच सोडाल सवय

पॉर्न पाहण्याने मिळतो क्षणिक आनंद; पण तसले VIDEO पाहण्याआधी हे वाचा, आजच सोडाल सवय

जर एखादी व्यक्ती सतत पॉर्न पाहत असेल, तर ती व्यसनाधीन होऊ शकते. पोर्नचं व्यसन तुमच्या झोपेवर, मानसिक आरोग्यावर आणि लैंगिक जीवनावरही वाईट परिणाम करू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये पॉर्न (Porn) पाहण्याची क्रेझ वाढली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मनं आता पॉर्न पाहणं सर्वांसाठी सोपं केलंय. पॉर्न पाहण्यात आता लोकांना काही विचित्र वाटत नाही. यामुळं भावनिक आनंद मिळत असल्याचा दावा अनेकजण करतात. याच कारणानं फक्त मुलंच किंवा पुरुषच नाही तर, मुली आणि महिलादेखील पॉर्न (Watching Porn) पाहतात. कधीकधी मनोरंजनासाठी पॉर्न पाहणं फारसं घातक नाही. परंतु, अनेक संशोधनांमध्ये हे उघड झालंय की, जर एखादी व्यक्ती सतत पॉर्न पाहत असेल, तर ती व्यसनाधीन होऊ शकते. पोर्नचं व्यसन तुमच्या झोपेवर, मानसिक आरोग्यावर आणि लैंगिक जीवनावरही वाईट परिणाम करू शकतं. जेव्हा तुम्ही पॉर्न पाहता, तेव्हा त्याचा तुमच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे तुमची विचार करण्याची आणि आकलन करण्याची म्हणजेच, समजून घेण्याची क्षमता कमकुवत होते. अनेक अभ्यासांत असं समोर आलंय की, जे लोक अधिक प्रमाणात पॉर्न पाहतात, त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती वाढू लागतात. खासकरून, जर तुमचा पार्टनर जास्त पॉर्न पाहत असेल तर, त्याचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होऊ शकतो. याचं कारण असं की, मुली किंवा स्त्रिया नेहमी सेक्ससाठी तयार किंवा इच्छुक असतात, असा गैरसमज पॉर्नमुळं निर्माण होतो. हे वाचा -  तुमच्या नखांकडे एकदा नीट पाहून घ्या, त्यांचा बदलेला रंग दर्शवतो या रोगांची लक्षणं पॉर्न तुमच्या मूडवर विपरीत परिणाम करतो. जे लोक जास्त प्रमाणात पॉर्न पाहतात, ते अनेकदा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आणि निराश दिसतील. याचं कारण असं की, जेव्हा तुम्हाला म्हणजेच तुमच्या मेंदूला पॉर्न पाहण्याची सवय लागते, तेव्हा त्याशिवाय आनंदाची किंवा समाधानाची भावना कशी जागृत करावी, हे समजत नाही. हे वाचा -  भयंकर! नणंदेच्या स्वभावाला वहिनी वैतागली; आंधळी कोशिंबीर खेळताना असा काढला काटा अशी व्यक्ती नेहमी काही बाह्य सुखाच्या शोधात असते. यामुळं ती नेहमी असमाधानी राहते आणि नैराश्याच्या दिशेनं जाते. यामुळं पॉर्न पाहण्याचं व्यसन लागू देणं इतर व्यसनांप्रमाणंच खूप घातक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या