कमी वयात डोक्यावर टक्कल पडतंय? हे घरगुती उपाय करून दिसेल आश्चर्यकारक परिणाम
डोक्यावरचे केस जाणे आणि टक्कल पडणे कोणालाही आवडत नाही. ज्यांच्या डोक्यावर केस नसतात त्यांना चारचौघात फिरण्याची लाज वाटते. सध्या कमी वयात टक्कल पडण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. स्ट्रेस, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली, प्रदूषण, धूळ इत्यादी केस गळण्याची प्रमुख कारण असतात. तेव्हा कमी वयात केसं गळती किंवा टक्कल पडण्याची समस्या जाणवत असेल तर घरगुती उपाय केल्याने काही दिवसातच आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात. टाळूवर मसाज करा : केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाने टाळूवर मसाज करा. मसाज केल्याने रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तप्रवाह सुधारल्यामुळे डोक्यावर नवीन केस उगवू लागतात. एरंडेल तेल : एरंडेल तेलमध्ये प्रथिने व्हिटॅमिन ई आणि अनेक प्रकारची खनिजे आढळतात. त्यामुळे त्यांचा फायदा केसांच्या उत्तम आरोग्यासाठी होतो.
कांद्याचा रस : कांद्याचा रस केसाला लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होऊन केस पटापट वाढतात. तेव्हा डोक्यावरून अंघोळ करण्यापूर्वी काहीवेळ डोक्याला कांद्याचा रस लावा. एलोवेरा, ऑलिव्ह ऑईल आणि मध : डोक्यावर टक्कल पडलं असेल तर नवीन केस येण्यासाठी एलोवेरा, ऑलिव्ह ऑईल आणि मध हे उपयुक्त ठरू शकतात. या तीन गोष्टींचे मिश्रण करून डोक्याला 25 मिनिटे लावून ठेवावे. मग हर्बल शॅम्पूने धुवून काढा. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते आणि डोक्यावरील केस देखील मजबूत होतात. Morning Routine : दररोज सकाळी भिजवलेले बदाम खा, डायबिटीजसह कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांपासून मुक्ती मिळवा खोबरेल तेल वापर : खोबरेल तेलामुळे टाळूचे मायक्रोबायोटा सुधारतं, ज्यामुळे केसांची मूळ आणि टाळू मजबूत होतात. ज्यामुळे केस गळणं कमी होत. आवळा : आवळ्यामधे केसांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात. तसेच आवळ्यात असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे केस पांढरी होत नाहीत.