JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Women Health : लग्नानंतर महिलांचं वजन का वाढतं? आहेत अनेक कारणं, काळजी घ्या!

Women Health : लग्नानंतर महिलांचं वजन का वाढतं? आहेत अनेक कारणं, काळजी घ्या!

बऱ्याचदा लग्न झालेल्या महिलांमध्ये वजन वाढीची समस्या जाणवते. तेव्हा लग्नानंतर महिलांचं वजन का वाढत याची कारणे जाणून घेऊयात.

जाहिरात

लग्नानंतर महिलांचं वजन का वाढतं? आहेत अनेक कारणं, काळजी घ्या!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लग्नानंतर एका महिलेच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. मग ते सामाजिक असो व्यक्तिगत असतो वा शारीरिक असो. बऱ्याचदा लग्न झालेल्या महिलांमध्ये वजन वाढीची समस्या जाणवते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की याला नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात. तेव्हा लग्नानंतर महिलांचं वजन का वाढत याची कारणे जाणून घेऊयात. जीवनशैलीतील बदल: लग्नानंतर स्त्रीच्या जीवनात अनेक बदल होत असतात. काहीवेळा बदल सक्रिय जीवनशैलीपासून अधिक बैठी जीवनशैलीत होतात. यामुळे त्यांच्या कॅलरींचा वापर कमी होतो आणि वजन वाढते. तसेच अनेकदा संसाराकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे स्त्रियांचे दुर्लक्ष होते.

आहारात बदल : लग्नानंतर स्त्रिया जोडीदाराच्या खाण्यापिण्याच्या सवयी अंगीकारतात. जर त्यांच्या जोडीदाराचा आहार हेल्दी नसेल तर महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो आणि त्यांचे वजन वाढते. तसेच घर, लहान मुलं यांच्याकडे लक्ष देण्याच्या नादात महिला बऱ्याचदा स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत, वेळी अवेळी जेवणे, शिळे अन्न खाणे इत्यादींमुळे देखील महिलांमध्ये लग्नानंतर वजन वाढण्याची समस्या जाणवते. Monsoon Tips : पावसाळ्यात पायांना फंगल इंफेक्शनचा धोका! 5 उपाय करा समस्येपासून दूर राहा हार्मोनल बदल : लग्नानंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. या बदलामुळे त्यांच्या अन्नाची इच्छा आणि शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होऊ शकतो. गर्भधारणा : गर्भधारणा देखील स्त्रियांच्या वजन वाढीचे महत्वाचे कारण आहे. याकाळात स्त्रियांचे नैसर्गिकरित्या वजन वाढते परंतु त्यानंतर ते कमी करणे कठीण जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या