फ्लेवर्ड हुक्का पितायं? मग सावधान, तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर
राजस्थान , 13 जून : सध्या युवकांमध्ये फ्लेवर्ड हुक्का पिण्याचा ट्रेंड आहे. परंतु फ्लेवर्ड हुक्का हा त्यांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याबाबत त्यांना कल्पना नाही. फ्लेवर्ड हुक्का प्यायल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. फ्लेवर्ड हुक्क्यामध्ये जरी अंमली पदार्थ नसले तरी त्यात तंबाखूचा समावेश असतो. अनेक युवकांना या हुक्क्याची टेस्ट फार आवडते आणि ते या सवयीचे अदीन होऊन जातात. त्यामुळे फ्लेवर्ड हुक्क्याचे सतत सेवन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. अल्वरच्या राजीव गांधी रुग्नालयाचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुखबीर सिंग तन्वर म्हणाले की, आजच्या तरुणांमध्ये फ्लेवर्ड हुक्क्या पिण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यामुळे ते अनेकदा त्याचे अति प्रमाणात सेवन करतात. या फ्लेवर्ड हुक्क्यामुळे माणसाला जीवघेणा आजार होऊ शकतो. कारण या हुक्क्यातही काही प्रमाणात तंबाखू असते. त्यामुळे तो आरोग्यासाठी हानिकारकच आहे. फ्लेवर्ड हुक्क्यात असे पदार्थ असतात ज्यांमध्ये तंबाखूचा समावेश असतो. त्यामुळे याचे वारंवार सेवन केल्याने त्याचा व्यक्तीला कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. हुक्का कॅन्सर होण्यासाठी ठेवढाच जबाबदार आहे जेवढं की सिगारेट आणि तंबाखूच्या अन्य गोष्टी. Health Tips : रोज किती चमचे मीठ खाण आरोग्यासाठी फायदेशीर? जास्त सेवन केल्याने होते नुकसान
इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा ही वाढतोय कल : डॉ. सुखबीर यांनी सांगितले की, फ्लेवर्ड हुक्का व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक सिगारेट देखील तरुणांमध्ये प्रचलित आहेत. इग्निशनमुळे सिगारेट जळते आणि त्यातून धूर निघतो. याचाही दुष्परिणाम तरुणाईवर होत आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक असून तरुणांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागू नये आणि ते निरोगी राहतील.