JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुरुषांनी उभं राहून लघवी करावी की बसून? जाणून घ्या योग्य पद्धत

पुरुषांनी उभं राहून लघवी करावी की बसून? जाणून घ्या योग्य पद्धत

पुरुष अनेकदा उभं राहून लघवी करतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पुरुषांना उभं राहूनच लघवी करण्याचा पर्याय असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल :  अनेकदा असं शिकवलं जातं की पुरुषांनी बसून लघवी न करता उभं राहून लघवी करावी. पण खरंच उभं राहून लघवी करणं पुरूषांसाठी चांगलं असतं की बसून लघवी करणं? असा प्रश्न बहुतांशवेळा उपस्थित करण्यात येतो. याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कदाचित हे पटकन तुम्हाला पटणार नाही, किंवा व्यावहारिक वाटणार नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का, पुरुषांनी उभं राहून लघवी करण्यापेक्षा बसून लघवी करणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. पुरुष अनेकदा उभं राहून लघवी करतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पुरुषांना उभं राहूनच लघवी करण्याचा पर्याय असतो. काही काळापूर्वी तज्ज्ञांनी पुरुषांना उभे राहून लघवी करण्याबद्दल इशारा दिला होता. तज्ज्ञांच्या मते, ’पुरुषांनी उभे राहण्याऐवजी बसून लघवी करावी. बसून लघवी करण्याची सवय असेल तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.’ नेदरलँड्समधील डॉक्टरांना असं आढळून आलं आहे की,’लघवी करण्यासाठी बसणे पुरुषांसाठी, विशेषतः ज्यांना प्रोस्टेटच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उभं राहण्याऐवजी बसून लघवी जास्त जोराने बाहेर पडते.’ भारतात पूर्वीच्या काळातील बहुतांश पुरूष बसून लघवी करायचे पण नंतर समाजातच ही पद्धत बदलत गेली. …तर मूत्राशयात तयार होतात खडे ‘एनएचएस’च्या मते, ‘लघवी करताना जर मूत्राशय (ब्लॅडर) पूर्णपणे रिकामे होत नसेल, तर अशावेळी मूत्राशयात खडे तयार होऊ शकतात.’ याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘मूत्रपिंड तुमच्या रक्तापासून वेगळ्या केलेल्या पाणी आणि टाकाऊ पदार्थांनी बनलेलं मूत्र तयार करतात. टाकाऊ पदार्थांपैकी एक म्हणजे युरिया असून जो नायट्रोजन आणि कार्बन पासून तयार होतो. जर तुमच्या मूत्राशयात थोडीशीसुद्धा लघवी उरली असेल, तर युरियामध्ये असलेली रसायने एकत्र चिकटून क्रिस्टल्स बनतात. कालांतराने, हे क्रिस्टल्स कठोर होतात, ज्यामुळे मूत्राशयात खडे तयार होतात.’ …म्हणून बसून लघवी करणं फायद्याचं डॉक्टरांच्या मते, ‘जर तुम्ही उभं राहून लघवी करत असाल, तर त्यामुळे तुमच्या ओटीपोटाचे आणि मणक्याचे स्नायू आकुंचन पावतात.’ 2014 च्या अभ्यासात तज्ज्ञांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून लोक बसून लघवी करत आहेत. जेव्हा लोक बसतात तेव्हा पेल्विस आणि हिप मसल्सना आराम मिळतो, व यामुळे लघवी करणं सोपं होतं. तज्ज्ञ काय सांगतात? यूसीएलए यूरॉलॉजी विभागातील सहयोगी क्लिनिकल प्राध्यापक डॉ. जेसी एन. मिल्स म्हणाले की, ‘बसून लघवी करणं अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो, ज्यांना जास्त वेळ उभं राहण्यात अडचण येते.’ ते म्हणाले, ‘असे अनेक लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की उभं राहून लघवी केल्यानंतर त्याचं मूत्राशय पूर्णपणे रिकामं होत नाही. अशावेळी ते बसून लघवी करतात.’ एका वेबसाइटशी बोलताना डॉ.मिल्स यांनी सांगितलं की, ‘तुम्ही जेव्हा खाली बसता, तेव्हा तुम्ही तुमच्या पोटाच्या स्नायूंचा जास्त वापर करता. त्यामुळे बसून लघवी केल्यानं तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामं होतं. परंतु या संशोधनाचा अर्थ असा नाही की, लघवी करताना प्रत्येकानं बसणं आवश्यक आहे. उभं राहून लघवी केल्यानंतर तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही उभं राहूनही लघवी करू शकता. पण जर तुम्हाला तुमचं मूत्राशय लघवी केल्यानंतरही पूर्णपणे रिकामं झालं नाही, असं वाटत असेल तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’ तर, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ज्ञ प्रा.स्टे रगिओस स्टेलिओस डौमोचसिस यांनी सांगितलं की, ‘जर तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामं होत नसेल, तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात.’ मूत्राशयात मूत्र राहिल्यास संसर्गामुळे सेप्टिक किंवा किडनी संसर्ग होऊ शकतो. अनेकदा तुम्हाला मूत्राशय रिकामे न होण्याची लक्षणे देखील दिसतात. अशावेळी तुम्ही डॉक्टरांना भेटणं महत्त्वाचं आहे. लघवीचा वेग कमी होणे, लघवी करताना ताण येणे, अधूनमधून लघवी होणे, लघवीला जास्त वेळ लागणे, अशा विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या