JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pune News : किडनी फेल झाल्यावर कशी ओळखालं? काय आहेत लक्षणं? Video

Pune News : किडनी फेल झाल्यावर कशी ओळखालं? काय आहेत लक्षणं? Video

किडनी फेल झाल्यावर कशी ओळखालं? काय आहेत लक्षणं? याबतात डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 जुलै : किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे.  धावती जीवनशैली, सकस आहाराची कमतरता, अतिरेकी मद्यपान, चुकीच्या खाणपान सवयी आदींमुळे भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि हळूहळू हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होऊ लागतो आणि शेवटी किडनीचं काम करणं मंदावतं. त्यामुळे किडनी फेल होण्याची लक्षणं नेमकी कोणती? यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल पुण्यातील बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माहिती दिली आहे. किडनी खराब झाल्यावर कुठली लक्षणं आढळतात? यामध्ये किडनी खराब झाली की त्याला क्रॉनिक म्हणतात. मळमळणे, उलटी होणे दम लागतो, भूक लागत नाही चक्कर येते, लघवी कमी किंवा जास्त प्रमाणात होते, डोळ्यांच्या सभोवताली सूज असते, काम कराव वाटतं नाही, डोळ्यांच्या आणि पायाच्या भोवती सूज येते.

यासाठी कुठली काळजी घ्याल? ब्लड टेस्ट करू शकतो. सोनोग्राफीमध्ये खडे सापडले तर सिटी स्कॅन करू शकतो. किडनीतले खडे काढून फंक्शन नॉर्मल होत. खराब होण्याची लक्षणं ? किडनी ही डायबिटीसमुळे ब्लड प्रेशर, रक्त वाहिन्या चॉकप झाल्यामुळे तसेच किडनीमध्ये खडे असतील यामुळे किडनी खराब होत असते.

Throat Cancer : घशात सारखा कफ राहतोय? वेळीच सावध व्हा, लगेच डॅाक्टरांशी करा संपर्क

संबंधित बातम्या

वेळीच निदान करणे गरजेचे किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाच्या लघवीच्या रंगात बदल होतो. किडनी निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक लक्षणं शरीराला जाणवत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर निदान करणे गरजेचे असते. अनेक घटनांमध्ये किडनी बरीच खराब झाल्यावर रुग्णाला त्याबद्दलची माहिती मिळत असते. परिणामी हातातील वेळ निघून गेलेली असते आणि नंतर डायलिसिसची वेळ येते. यामुळे वेळीच ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करू शकता, असं बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या