धनंजय दळवी, प्रतिनिधीमुंबई, 12 मे : ‘आला उन्हाळा आरोग्य सांभाळा’, असे नेहमी म्हंटले जाते. त्यातच उन्हाळ्यात मधुमेह झालेल्या रुग्णांनी तर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी मधुमेही रुग्णांनी पंचसुत्रीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. उन्हाळा आला की शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे अनेक रोगांचा प्रसार व्हायला वेळ लागत नाही त्यातच मधुमेह, (डायबेटीस) झालेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबईतील
मधुमेह तज्ञ डॉ. निखिल वरगे यांनी याबाबतची पंचसुत्री सांगितली आहे. मधुमेही रुग्णांसाठी पंचसुत्री 1) आहाराचे नियोजन :मधुमेहींनी आहाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उन्हामुळे पाण्याची कमतरता भासते त्यामुळे नेहमी पेक्षा उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे त्याचबरोबर लिंबु पाणी, ताक, दही, आवळा ज्युस, काकडी, टरबूज, सफरचंद, टोमॅटो यांचा आपल्या आहारात अधिक समावेश करावा. आंबा, द्राक्षे, आईस्क्रीम, कुल्फी, चहा कॉफी, मद्यपान, एनर्जी ड्रिंक टाळले पाहिजे. 2) व्यायाम :उन्हाळा आहे आणि अधिक घाम येतो म्हणून व्यायाम टाळू नका. व्यायामाची वेळ बदला. सकाळी लवकर उठून सुर्य उगवण्याच्या आधी व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा व्यायामासाठी लाभ घ्या. खुर्चीवर बसून किंवा घरातल्या घरातही व्यायाम करता येतो.
तपासणी :आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे. आपला रक्तदाब कसा आहे. याची तपासणी उन्हाळ्यात वारंवार केली पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातील बदलाची माहिती वेळेवर मिळते. 4) पायाची काळजी : उन्हामध्ये मधुमेही रुग्णांनी फिरू नये कारण मधुमेही रुग्णांमध्ये पाय बधीर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायाला चटके बसून जखम होण्याची शक्यता असते. ते सहज रुग्णांना समजत नाही. उन्हामध्ये जाण्याची गरज असेल तर डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल, अंगावर सुती आणि सैल कपडे घातले पाहिजे तसेच पायात मोजे आणि चांगल्या प्रकारचे सॅन्डल, बूट घालूनच उन्हामध्ये गेले पाहिजे तसेच वारंवार पाणी पिले पाहिजे. अशी काळजी प्रत्येकाने घ्यावी.
…तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते कलिंगड! खाताना करू नका ही चूक
5) डिहायड्रेशन टाळा : उन्हात घाम आल्याने शरीरावर इन्फे्नशन होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे लघवीचा त्रास होतो. त्याचा किडणीवरही तात्काळ परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि वरील पंचसुत्रीचा अवलंब करा. या पंचसुत्रीचा वापर करुन मधुमेह झालेल्या प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घ्यावी आणि उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी प्रत्येक मधुमेह झालेल्या रुग्णांनी आपल्या जीवनात अंगिकारली तर उन्हाळा सुखकारक होईल असं, डॉ. वरगे यांनी स्पष्ट केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.