अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर),03 मार्च : सतत हेडफोन आणि इयरफोनने तरुणांना बहिरेपणाला तोंड द्यावे लागत आहे. नियमित हेडफोन, एअरफोन वापरणाऱ्या दहापैकी दोन तरुणांना बहिरेपणा येत असल्याचे निरीक्षण संभाजीनगरच्या घाटीतील डॉक्टरांनी नोंदवले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आठवड्यातून 4 दिवस होणारी कान, नाक, घसा विभागाची ओपीडी आता दररोज होत आहे. इतकेच काय आठवड्यातून तीनच दिवस होणाऱ्या शस्त्रक्रियाही आता दररोज होऊ लागल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी 3 मार्चला जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. घाटीतील कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दररोज ओपीडीत येणाऱ्या रुग्णांमध्ये 50% रुग्ण कानाशी संबंधित आजाराचे असतात कानाची नस कमजोर झाल्याने कान फुटणे, वाहने,जन्मता बहिरेपणा हेडफोन वापरामुळे श्रवणदोष निर्माण झालेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कान नाक घसा संदर्भात 1 जानेवारीपासून ओपीडीत दररोज रुग्ण सेवा दिली जात असून, शस्त्रक्रिया देखील दररोज होत आहे. हा चिंतेचा विषय आहे.
डॉक्टरांनी दिला सल्ला
सतत हेडफोन, इयरफोन वापरू नये कानांना पुरेशी विश्रांती द्यावी. गोंगाटात काम करताना बहिरेपणा आल्याची समस्या घेऊन महिन्याला किमान 2 ते 3 कामगार घाटी रुग्णालयात येतात. जर समस्या निर्माण झाल्यास कामगारांनी श्रवण संरक्षण उपकरण वापरले पाहिजे. सतत सर्दी खोकला होत असेल तर वेळीच उपचार घ्यावा.
जन्मता बहिरेपणावर वेळीच उपचार घेतल्यास तुम्ही ऐकू शकतात. त्यातून बोलू शकतात, कानात टोकदार वस्तू न टाकल्यास या समस्यांपासून आपण वाचू शकतो. या समस्यांवर उपचार आणि विलाज नाही असे नाही मात्र नागरिकांनी ते पाळणे गरजेचे आहे.
लहान मुले तरुण वयोवृद्ध सर्वजण आपण सर्रास हेडफोन आणि हेडफोन वापरताना पाहतो. मात्र हेच हेडफोन हवेहवेसे वाटणारे तुमच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम टाकतात. या गोष्टी बऱ्याच जास्त प्रमाणात जर वापरल्या जात असतील तर तुम्हाला कायमचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो.
त्यामुळे आपण करत असलेल्या हेडफोन आणि हेडफोनचा वापर हा किती करावा आणि केव्हा करावा हा विचार करण्याचा विषय बनला असून, त्यामुळे तुम्ही वापरणाऱ्या उपकरणांमुळे तुमच्या आरोग्यावर तर दुष्परिणाम होत नाही ना याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे.