मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनेने त्रस्त आहात? तज्ञांनी दिलेल्या 5 सोप्या टिप्स फॉलो करा
मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात क्रॅम्प येत असतात. यादिवसात क्रॅम्प्समुळे काही महिलांना जास्त तर काहींना कमी वेदना होतात. यामुळे त्यांना दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवत राहतो. अशावेळी महिलांना वेदनेमुळे चांगली झोप देखील मिळत नाही. योग्य दिनचर्येचा अभाव हे देखील यामागचे एक प्रमुख कारण आहे. अयोग्य दिनचर्येमुळे पीरियड्स दरम्यानच्या वेदना वाढतात. पहिल्या दोन दिवसात हा त्रास इतका वाढतो की छोटी कामे करणेही शक्य होत नाही. तेव्हा मासिकपाळीत येणाऱ्या क्रॅम्सचा त्रास कमी होण्यासाठी तज्ज्ञांनी सुचविलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचा त्रास कमी होऊ शकतो. वेळ निश्चित करा: मासिक पाळीच्या काळात महिलांना नीट झोप न लागणे, पाठीचा खालचा भाग दुखणे आणि मांडीचे दुखणे या समस्या सर्वाधिक असतात. अशा परिस्थितीत, तुमची दिनचर्या सुधारून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमची झोप आणि उठण्याची वेळ निश्चित करावी लागेल. वेळेवर झोपणे आणि उठणे, यासवयीमुळे मासिक पाळी दरम्यानच्या वेदना कमी होऊ शकतात. कोमट पाण्याने आंघोळ करा : मासिक पाळीच्या काळात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. असे केल्याने पोट आणि पाठीच्या दुखण्यासोबतच शरीराच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल. यासोबतच मासिक पाळीच्या अनियमिततेपासूनही सुटका मिळू शकेल. तसेच वेदना होत असलेल्या भागात तुम्ही हलक्या हातांनी मालिश करू शकता.
बेडरूम थंड ठेवा : जर तुम्हाला या काळात चांगली झोप घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची बेडरूम थंड ठेवावी लागेल. असे केल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि तुम्हाला चांगली झोप लागते. मेडिटेशन आणि व्यायाम करा: मासिक पाळीदरम्यान मेडिटेशन किंवा व्यायाम केल्याने वेदनेपासून आराम मिळतो, तसेच तुमचा मूड देखील आनंदी रहातो. सुधारतो. या काळात तुम्ही हलका व्यायाम करू शकता. या दरम्यान, वजन न उचलता चालणे, स्ट्रेचिंग, एरोबिक्स, इत्यादी व्यायाम प्रकार करणे फायदेशीर ठरू शकते. गरम पाण्याच्या पिशवीने मसाज करा: जर मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असतील तर पाठीच्या खालच्या भागाला आणि कंबरेला गरम पाण्याने मसाज करता येईल. यासाठी तुम्ही हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याच्या बाटलीची मदत घेऊ शकता. असे केल्याने तुम्हाला केवळ दुखण्यापासून आराम मिळत नाही, तर मासिक पाळीच्या अनियमिततेपासूनही सुटका मिळते. कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच या 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आल्याचा चहा : मासिक पाळी दरम्यान वेदना तसेच मळमळ होणे सामान्य आहेत. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दुध न घातलेली आले आणि काळी मिरी पूड टाकलेली चहा पिऊ शकता . या व्यतिरिक्त तुम्ही जिरे, हळद आणि मध यांचाही काढा बनवून त्याचे सेवन करू शकता. कॅफीनचे सेवन कमी करा: मासिक पाळी दरम्यान, विशेषतः झोपेच्या सहा तास आधी कॅफिनचे सेवन टाळा. कॅफीन एक उत्तेजक आहे, जे तुम्हाला बराच वेळ जागे ठेवण्याचे काम करते. चहा, चॉकलेट, कोक, कोल्ड ड्रिंक्स आणि वेदनाशामक औषधांच्या इतर स्रोतांमध्ये कॅफीनचा समावेश असतो तेव्हा या गोष्टीचे सेवन टाळा. तसेच महिलांनी मासिक पाळी दरम्यान धूम्रपान करणे देखील टाळायला हवे.