मुंबई, 7 जुलै : व्यक्तीच्या झोपण्याच्या सवयींचा (Sleeping Habits) परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. आपल्या शरीरासाठी झोप किती महत्त्वाची आहे हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. शरीरातील सर्व कार्ये किती चांगल्या प्रकारे होतील आणि पचनक्रिया नीट चालेल की नाही यावरही झोपेचा (Sleep Benefits) खूप परिणाम होत असतो. आपण कोणत्या बाजूला चेहरा करून किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणे (Best Sleeping Position) चांगले आहे जेणेकरून अन्न पचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील. कोणत्या पद्धतीने झोपणे आहे चांगले? हेल्थ लाईनच्या मते, संशोधनात हे सिद्ध झाले आहे की जर तुम्ही एका बाजूला चेहरा करून किंवा एका कुशीवर झोपलात (Sleeping On One Side) तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. एका अंगावर झोपणे योग्य असते. कारण असे झोपल्याने सांधेदुखी आणि पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात. जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून म्हणजेच डाव्या कुशीवर (Sleeping On Left Side) झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण असे केल्याने शरीराला आरामही मिळतो आणि अनेक फायदेही होतात. डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे (Benefits Of Sleeping On Left Side) - डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. जर तुम्ही अनेकदा पोट खराब होणे किंवा पचन न होणे यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पचनक्रियेत बरीच सुधारणा दिसून येते.
केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही वरदान आहे ‘हे’ फळ, फायदे वाचून थक्क व्हाल- छातीत जळजळ, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. - सांधेदुखीच्या त्रासात थोडा आराम मिळू शकतो.
Women’s health : महिलांसाठी अत्यंत उपयुक्त! मासिक पाळीमध्ये साबुदाणा खिचडी खाण्याचे ‘हे’ आहेत महत्त्वाचे फायदे- डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. - मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.