तुम्ही ज्यावेळी गर्भवती राहण्याचा विचार करता तेव्हा साबुदाण्याची खिचडी महत्त्वाची ठरते. तसेच खिचडीमुळे प्रजनन पातळीदेखील चांगली सुधारते. जेव्हा तुम्ही गर्भवती राहता, त्यानंतर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होतात, तेव्हा 8 दिवसांतून 2 वेळी ही खिचडी खावी.
महिलांना मासिक पाळीमध्ये खूप त्रास होत असतो. कारण, रक्तस्त्राव जास्त होत असतो. तो टाळायचा असेल, महिलांना 8 दिवसांतून एकदा साबुदाण्याची खिचडी खावी. पण, रक्तस्त्राव जास्त होत असेल, तर साबुदाण्याची खिचडी ही मासिक पाळीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खायला हवी.
महिलांना मासिक पाळीमध्ये भूक जास्त लागत असते. जेव्हा भूक लागते, अशावेळी दही आणि साबुदाणा खिचडी खावी. त्याचा फायदा नक्की होतो.
सर्रास मासिक पाळीमध्ये महिलांचं डोकं जड होतं, ते ठणकत असतं. अशक्तपणा जाणवत असतो. अशावेळी महिलांनी साबुदाण्याची खिचडी खाणं उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर ओव्हुलेशनचे डाग दिसत असतील, तर साबुदाण्याची खिचडी नक्की खावी.
ताप, सर्दी, खोकला, अशा आजारातून तुम्ही नुकतेच बाहेर पडला आहात. पण, तुम्हाला अशक्तपणा आलेला असतो. अशावेळी तुमचं शरीर पुर्वीसारखं सामान्य होण्यासाठी साबुदाण्याची खिचडी महत्त्वाची ठरते. डाॅक्टरदेखील अशा रुग्णांना तोच सल्ला देतात.