JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : वयाच्या 18 वर्षांनंतरही वाढू शकते तुमची उंची, फक्त करा हे उपाय

Health Tips : वयाच्या 18 वर्षांनंतरही वाढू शकते तुमची उंची, फक्त करा हे उपाय

काही लोकांना त्यांची उंची आणखी वाढणार नाही या कारणामुळे खूप नैराश्य येते. पण काळजी करण्यासारखे काही नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून तुम्ही हे ध्येय साध्य करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 डिसेंबर : तुम्हीही तुमच्या उंचीवर खुश नाही का? यासाठी तुम्ही काय करू शकता? उंच वाढणे हे जगातील लाखो लोकांचे स्वप्न आहे. यासाठी पालकांना चांगला पौष्टिक आहार आणि मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या संदर्भात, असे काही अभ्यास देखील केले गेले, ज्यामध्ये तरुणपणातही तुमची वाढू शकते का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. काही घटक उंची वाढवण्यासाठी काम करतात, जसे की आनुवंशिकता, दैनंदिन आहार, जीवनशैली, दैनंदिन कामांची टक्केवारी इ. काही लोकांची उंची 18 वर्षांनंतरही वाढते. पौगंडावस्थेपर्यंत प्रत्येकजण दररोज 2 इंच दराने वाढतो. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत उंची 4 टक्के दराने वाढते. उंची कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे हाडांची वाढ थांबणे हे काही सर्वेक्षणांतून समोर आले आहे.

Chanakya Niti : महिलांच्या ‘या’ गुणांपुढे नतमस्तक होतात पुरुष, तुम्हाला माहित आहेत?

काही लोकांना त्यांची उंची आणखी वाढणार नाही या कारणामुळे खूप नैराश्य येते. पण काळजी करण्यासारखे काही नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून तुम्ही हे ध्येय साध्य करू शकता.

पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या : अन्नामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, कॅल्शियमसारखे अनेक पौष्टिक घटक उंची वाढवण्यास मदत करतात. धूम्रपान करू नका : सिगारेट ओढल्याने तुमच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, ज्या मातांनी दिवसातून 10 किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढल्या आहेत त्यांची मुले 0.65 सेमी लहान आहेत. दररोज वेळेवर झोप : दररोज चांगली झोप घेतल्याने उंची वाढते. झोपेच्या वेळी ग्रोथ हार्मोनचा प्रसार होतो, त्यामुळे चांगल्या उंचीसाठी चांगली झोप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास महिलांनाही येतात अनेक समस्या, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

संबंधित बातम्या

योग्य स्थितीत बसा : चुकीच्या स्थितीत बसल्याने तुमची उंची खुंटू शकते. योग्य उंची राखण्यासाठी योग्य पद्धतीने बसा, असे तज्ज्ञांचे मत आहे. चुकीच्या आसनात बसल्याने तुमच्या उंचीवर परिणाम होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या