आयुष्यात अनेक चांगले-वाईट दिवस येतात पण या दिवसात कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि आपले वर्तन कसे असावे यावर चाणक्यानी आपल्या नीतिशास्त्रात लिहिले आहे. आज जाणून घेऊया. चाणक्य नीतीनुसार महिलांचे असे कोणते गुण आहेत, ज्यावर पुरुष भाळतात.
चाणक्य नितीमध्ये सांगितल्याप्रमाणे महिलांमध्ये असलेले काही गुण पुरुषांना विशेष आकर्षित करता. महिलांच्या गुणांमुळे त्यांचे स्वतःचेच नाही. महिलांच्या या गुणांमुळे केवळ त्यांचे स्वतःचेच नाही. तर त्यांच्यासोबतच्या पुरुषाचेही जीवन सोपे होते.
टीव्ही नाईनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान असतात. असे आचार्य चाणक्य म्हणतात. स्त्रियांमध्ये असलेल्या धैर्यामुळे त्या अनेक लहान मोठ्या अडचणींवर सहज मात करू शकतात.
बऱ्याचदा पुरुष गंभीर परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरतात. स्त्रिया त्यांच्या बुद्धिमत्तेने गंभीर परिस्थितीही सहज हाताळू शकतात.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक हुशार आणि निश्चयी असतात. चाणक्य नितीमध्ये असेही सांगितले आहे की, पुरुषांना शूर स्त्रिया आवडतात आणि अशा स्त्रियांसमोर पुरुष अनेकदा नतमस्तक होतात.
पुरुषांपेक्षा महिला अधिक भावनिक असतात. पण ही त्यांची कमजोरी नसून त्यांची आंतरिक शक्ती आहे जी महिलांना प्रत्येक परिस्थितीत टिकून राहतात. धाडस आणि भावनाशीलता हा स्त्रियांचा असा गुण आहे, ज्यावर पुरुष भाळतात.
आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या महिलांमध्ये माफ करण्याची प्रवृत्ती असते, पुरुष त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)