JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Women Sexual Health: सेक्सविषयीच्या या काही गोष्टी ज्या महिलांना माहीत असाव्यात

Women Sexual Health: सेक्सविषयीच्या या काही गोष्टी ज्या महिलांना माहीत असाव्यात

Women Sexual Health: कित्येक महिला सेक्सविषयी उघडपणे बोलत नाहीत. सेक्सविषयीच्या समस्यांवर चर्चा करणं सुद्धा लाजिरवाणं वाटतं. पण, तुमच्या जोडीदारासोबत निरोगी नात्यासाठी तुमचे सेक्स लाईफ चांगले असणे आवश्यक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 नोव्हेंबर : अजूनही कित्येक महिला सेक्सविषयी उघडपणे बोलत नाहीत. सेक्सविषयीच्या समस्यांवर चर्चा करणं सुद्धा लाजिरवाणं वाटतं. पण, तुमच्या जोडीदारासोबत निरोगी नात्यासाठी तुमचे सेक्स लाईफ चांगले असणे आवश्यक आहे. पण सेक्सचे नाव येताच आपल्या मनात हजारो प्रश्न आणि संकोच येतात. विशेषत: काही महिला आपल्या जोडीदाराशीही याबद्दल बोलण्यास लाजतात. या बातमीतून आपण सेक्स लाईफविषयी काही गोष्टींची माहिती घेऊयात, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ज्याने तुमचे सेक्स लाईफ अधिक चांगले होईल. तसेच तुमचे आरोग्य चांगले (Women Sexual Health) राहील. वुमेन कंडोम कंडोमचे नाव ऐकल्यावर असे वाटते की, ते फक्त पुरुषांसाठीच असते. मात्र, स्त्रियांसाठीही कंडोम अस्तित्त्वात आहे हे बहुतेक स्त्रियांना माहीत नसते. ते देखील पुरुषांसारखे फ्लेवर्डही असतं, त्याचा वापर करण्यात कसलाही संकोच करण्याची गरज नाही. आपण ते संरक्षणासाठी वापरू शकता. सेक्स टॉईजबद्दल जाणून घ्या लस्ट स्टोरी पाहिल्यानंतर लोकांना व्हायब्रेटरबद्दल माहिती मिळाली पण तरीही लोक त्यापासून दूर आहेत. सेक्स लाईफ इंटरेस्टिंग बनवण्यासाठी बेडरूममध्येही ही सेक्स टॉईज आणण्याकडं अनेकांचा कल वाढला आहे. हे वाचा -  Va Tech Wabag शेअरमध्ये आज 7 टक्क्याहून अधिकची तेजी; तज्ज्ञांचा काय आहे सल्ला? ल्युब वापरणं सेक्सबद्दल कोणीच उघडपणे बोलत नसल्यानं, त्याबाबत अनेकांच्या मनात शंका, संभ्रम असतात. परिणामी स्त्रियांना लालसरपणा येतो, चिडचिड होते, तर कधी कधी सेक्सदरम्यान कंडोम तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित सेक्ससाठी ल्युब वापरणं महत्त्वाचं आहे. हे वाचा -  तिसरी मुलगी झाली म्हणून महिलेचा कुटुंबीयांकडून खून, पतीनेच घातला अखेरचा घाव अॅपची मदत घेऊ शकता अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा अपडेट जाणून घेऊ शकता. तसेच तुम्हाला तुमच्या प्रजनन कालावधीबद्दल देखील माहिती मिळेल. त्यामुळं जर तुम्हाला आई व्हायचं असेल, तर तुमचे एग कधी निघेल हे तुम्हाला कळू शकते. त्यानुसार तुम्ही सेक्सचे नियोजन करू शकता. तसेच, तुम्हाला गर्भधारणा नको असली तरीही तुम्ही सावध राहू शकाल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या