JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Summer Health: उन्हाळ्यात व्यायाम करताना या चुका टाळा; दवाखान्यात जाण्याची येईल वेळ

Summer Health: उन्हाळ्यात व्यायाम करताना या चुका टाळा; दवाखान्यात जाण्याची येईल वेळ

Summer Workout Mistakes: ऋतुनुसार वर्कआउट रुटीनमध्ये काही बदल करा. काहीजण कधीही व्यायाम किंवा वर्कआउट करायला लागतात, असं करणं विशेषत: उन्हाळ्यात योग्य नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 मे : उन्हाळा असो किंवा कोणत्याही ऋतुत काही लोक त्यांच्या दैनंदिन व्यायामात अजिबात खंड पडू देत नाहीत. मात्र, या कडक उन्हात अनेकवेळा जास्त व्यायाम केल्यानेही नुकसान होऊ शकते. मात्र, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करणे आवश्यक आहे. फक्त ऋतुनुसार वर्कआउट रुटीनमध्ये काही बदल करा. काहीजण कधीही व्यायाम किंवा वर्कआउट करायला लागतात, असं करणं विशेषत: उन्हाळ्यात योग्य नाही. जसजसे हवामान बदलते तसतसे वर्कआउट रूटीन देखील बदलले पाहिजे. तर योग्य माहितीच्या अभावामुळे, लोक वर्कआउट करताना काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचेच नुकसान होते. जाणून घेऊया उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणत्या चुका (Summer Workout Mistakes) टाळाव्यात. उन्हाळ्यात व्यायामादरम्यान होणाऱ्या चुका - OnlyMyHealth मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, व्यायाम करताना तुम्ही कसे कपडे घालता हे खूप महत्त्वाचे आहे. व्यायामासाठी जिममध्ये जात असाल तर तुम्ही योग्य कपडे घातले पाहिजेत. इथेच बहुतेक लोक चुका करतात. व्यायाम करताना कधीही गडद रंगाचे कपडे घालू नका. खूप घट्ट कपडे परिधान केल्याने देखील तुम्हाला जास्त घाम येतो, तुम्हाला आराम दायी वाटत नाही. व्यायाम करताना, हलक्या रंगाचे सैल कपडे घाला, जेणेकरून तुम्हाला उष्णतेवर मात करता येईल. फॅब्रिक देखील हुशारीने निवडा. उन्हाळ्यात व्यायाम करताना शरीरातून भरपूर घाम निघतो. अशावेळी काही लोक हार्ड व्यायाम करतात, परंतु स्वतःला हायड्रेट ठेवत नाहीत. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. या ऋतूत तुम्ही प्रोटीन शेक जास्त पित असाल तर असं करू नका. उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट्सची सर्वाधिक गरज असते. प्रोटीन शेक, प्रोटीन सप्लिमेंट्स ऐवजी सोडियम युक्त पेय प्यावे. वर्कआउट केल्यानंतर नारळ पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. हे वाचा -  Betel nut: घरात नांदेल सुख-शांती-समृद्धी; पुजेवेळी सुपारीचा करा असा उपयोग काही लोक उन्हाळ्यातही तासन्तास जिममध्ये व्यायाम करतात, असं अजिबात करू नका. तुम्ही ऐरव्ही तासभर हार्ड व्यायाम करत असाल तर या कडक उन्हात फक्त 30 मिनिटेच व्यायाम करा. जास्त व्यायाम केल्याने शरीराला थकवा येऊ शकतो. प्रत्येक आठवड्यात हलके व्यायाम करा. तसेच सकस पदार्थ खा, म्हणजे ऊर्जेची कमतरता भासणार नाही. जास्त हार्ड व्यायाम करणे टाळा. हे वाचा -  मूल नको नको म्हणणाऱ्या GF चं भलतंच सत्य समोर आलं; Photo पाहताच BF ला बसला झटका उन्हाळ्यात व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मिंग-अप न करण्याची सवयही चुकीची आहे. तुमचे हृदय आणि श्वास त्या पातळीवर आणण्यासाठी शरीराला उबदार करणे महत्त्वाचे आहे. यामुळे व्यायाम करताना शरीरावर अनावश्यक दबाव पडत नाही. यासोबतच स्ट्रेचिंगही आवश्यक आहे. जर तुम्ही वर्कआउटच्या शेवटी स्ट्रेचिंग करत नसाल तर आजपासूनच स्ट्रेचिंग सुरू करा. यामुळे शरीर लवचिक राहते. स्नायू शिथिल होतात, तणाव कमी होतो. रक्ताभिसरण बरोबर राहते. शरीराची एकंदर स्थिती सुधारते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या