Home /News /viral /

मूल नको नको म्हणणाऱ्या GF चं भलतंच सत्य समोर आलं; Photo पाहताच BF ला बसला झटका

मूल नको नको म्हणणाऱ्या GF चं भलतंच सत्य समोर आलं; Photo पाहताच BF ला बसला झटका

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अडीच वर्षे जिच्यासोबत होता त्या गर्लफ्रेंडबाबत असं सत्य समजलं ज्यामुळे बॉयफ्रेंड हादरला.

    मुंबई, 05 मे : प्रेम, नातं यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास आणि शेअरिंग. पण बऱ्यादा काही कपल काही कारणामुळे जाणूनबुजून काही गोष्टी एकमेकांपासून लपवतात. पण या गोष्टी अचानक समोर आल्यानंतर काय होऊ शकतं, याचा एका महिलेला प्रत्यय आला. तिने आपल्या रिलेशनशिपमधील एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका फोटोमुळे तिचं असं सत्य तिच्या बॉयफ्रेंडला समजलं ज्यामुळे त्याला धक्काच बसला. त्यांचं नातं ब्रेकअपच्या मार्गावर येऊन पोहोचलं आहे (Boyfriend shocked after watching pregnant girlfriend). महिलेच्या फॅमिलीतील कुणा सदस्याच्या बर्थडे होता. बर्थडे पार्टीत त्यांच्या फॅमिलीचे जुने फोटो दाखवले जात होते. महिलेचा बॉयफ्रेंडही या पार्टीत होता. त्यावेळी त्याला असा फोटो दिसला जे पाहून तो हादरलाच. त्याच्या गर्लफ्रेंडचं पोट मोठं दिसत होतं. ती चक्क प्रेग्नंट होती (Girlfriend pregnant 7 years ago). महिलेने  सांगितलं, ती आणि तिचा बॉयफ्रेंड गेल्या अडीच वर्षापासून एकत्र आहेत. दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. बॉयफ्रेंडने बऱ्याचदा मूल हवं असण्याची इच्छा व्यक्त केली पण तिने त्याला आपल्याला मूल नको म्हणत स्पष्टपणे नकार दिला. पण या फोटोत ती 9 महिन्यांची प्रेग्नंट होती. हे वाचा - क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं, ती 20 वर्षांची होती तेव्हा आपल्या बहिणीसाठी सरोगेट मदर बनली होती. तिच्या बहिणीला गर्भधारणेत अडचण येत होती, बऱ्याच वेळा तिचा गर्भपात झाला आहे. अशात आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी तिने आपली बहीण आणि भावोजीच्या मुलाला आपल्या पोटात वाढवलं. मुलाला जन्म दिल्यानंतर त्याच्याबाबत तिला त्या मुलाबाबत काहीच वाटलं नाही. ते मूलही आता 7 वर्षांचं झालं आहे. मुलाच्या जन्मानंतर तिच्या मनात आईसारखी भावना नव्हती. पण आता तिच्या बॉयफ्रेंडला वाटतं की तिने आपलं मूल दत्तक दिलं. तिने त्याला सर्व सत्य सांगितलं. तरी तो काही ते स्वीकारायला तयार नाही. जर ती आपल्या बहिणीच्या मुलाला जन्म देऊ शकते तर तिला स्वतःच्या मुलाला जन्म देण्यात काय त्रास आहे, असं त्याने तिला विचारलं. हे वाचा - लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याने केली भलतीच डिमांड; महिलेने सोशल मीडियावरच मागितली मदत u/HelicopterNo3063 नावाच्या रेडिट अकाऊंटवर तिने आपली ही स्टोरी शेअर केली आहे. महिलेच्या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काहींनी महिलेला तिच्या निर्णयावर ठाम राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तिच्या बॉयफ्रेंडलाही वडील बनण्याचा हक्क आहे तो तिने हिरावू नये, असं म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral, Viral news

    पुढील बातम्या