मुंबई, 14 फेब्रुवारी : कोंड्याची समस्या डोक्यावरच्या केसांमध्ये असते. परंतु, काहीजणांना भुवयांमध्येही कोंडा झाल्याचा अनुभव येतो. विशेषत: हिवाळ्यात भुवयांमध्ये कोंड्याची समस्या (Eyebrow Dandruff Problem) अधिक वाढते. भुवयांमधील कोंडा (Eyebrow) चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतो. तशी, ही समस्या फार गंभीर नाही आणि तुम्ही काही घरगुती उपाय करून त्यावर उपचार करू शकता. आयब्रोमध्ये कोंडा होण्याची कारणं आणि ती दूर करण्यासाठीच्या टिप्स (Home Remedies for Eyebrow Dandruff) जाणून घेऊया. भुवयांमध्ये कोंडा का होतो? MedicalNewsToday च्या बातमीनुसार, भुवयांमध्ये कोंडा होण्याच्या कारणांमध्ये कोरडी त्वचा, एक्जिमा, सोरायसिस, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस, सेबोरेरिक डर्माटायटिस (seborrheic dermatitis) आदींचा समावेश होतो. या समस्यांमुळं भुवयांमध्ये कोंडा झाला असेल तर त्वचारोगतज्ज्ञ त्याचं निदान करतात. ते मुख्य कारण आणि लक्षणं तपासून त्यावर उपचार करतात. भुवयांमध्ये कोंडा होण्याची लक्षणं डोक्यातील कोंड्यासारखीच असतात. भुवयांच्या आणि त्याभोवतीच्या भागात पांढरे, राखाडी, पिवळे पापुद्रे निघणं, जळजळ, खाज सुटणं ही त्याची काही लक्षणं आहेत. भुवयांमधून कोंडा हटवण्यासाठी उपचार यासाठी तुम्हाला रोज चांगल्या दर्जाचं मॉइश्चरायझर भुवयांवर लावावं लागेल. तुमची समस्या फार वाढली असल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं चांगलं ठरेल. कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस झाल्यास कोंडा काढून टाकण्यासाठी शॅम्पू, औषध, अँटी-इच क्रीम इ. वापरण्यासाठी दिलं जाऊ शकतं. भुवयांतील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोरड्या त्वचेमुळं भुवयांवर कोंड्याची समस्या असेल तर, तुम्ही नारळ, एवोकॅडो, जोजोबा, टी ट्री ऑइल यासारख्या काही नैसर्गिक तेलांचा वापर करू शकता. टी ट्री ऑइलमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळं कोंड्याची समस्या दूर होते. हे वाचा - केसांच्या अनेक समस्यांवर कारलं आहे गुणकारी; कोंडा घालवण्यासाठी ठरेल उपयोगी फेशियल मॉइश्चरायझरनं तुमची त्वचा हायड्रेट करा. सनस्क्रीन लावा, जेणेकरून सूर्याची हानिकारक किरणं त्वचेला इजा करणार नाहीत. ज्याप्रमाणं लिंबाचा रस लावल्यानं डोक्यातील कोंडा दूर होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे याच उपायानं तुम्ही भुवयांच्या कोंड्यापासूनही सुटका मिळवू शकता. लिंबामध्ये असलेलं सायट्रिक अॅसिड बुरशीजन्य संसर्ग कमी करतं. लिंबाचा रस कापसावर लावा. हा कापूस भुवयांवर ठेवा. 5 मिनिटं असंच राहू द्या. नंतर पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. त्याचे फायदे काही दिवसांत दिसून येतील. हे वाचा - Hair care: कोंडा आणि कोरड्या केसांचं कारण तुमच्या केस धुण्यात तर नाही ना? ही योग्य पद्धत वापरा हातांनी, बोटांनी वारंवार चेहरा किंवा भुवयांना स्पर्श करणं टाळा. हातातील घाण, बॅक्टेरियामुळं त्वचेवर मुरुमं, पिटिका, कोंडाही होतो.