नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरोना महामारीमुळं आरोग्याबाबत नागरिकांमध्ये सतर्कता वाढली आहे. लोक आरोग्यदायी पदार्थ खाण्याला अधिक पसंती देत आहेत. सकाळचा नाश्ता शक्य तितका हेल्दी करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हीही चांगल्या ब्रेकफास्टसाठी पर्याय शोधत असाल तर सकाळी गूळ (Jaggery) मिसळून गरम दूध (Hot Milk) प्या, त्याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी व्यतिरिक्त, कॅल्शियम, प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिड दुधात आढळतात, तर गुळात सुक्रोज, ग्लुकोज, लोह आणि अनेक खनिजे आढळतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतलं जातं तेव्हा ते एक आरोग्यदायी पेय बनतं. त्यामुळं आपल्या शरीराच्या गरजा त्वरित पूर्ण केल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया गरम दुधात गूळ मिसळून पिण्याचे काय-काय फायदे (Health Benefits Of Milk With Jaggery ) आहेत. 1. रक्त शुद्ध होतं हे पेय रोज प्यायल्यास त्यामुळं शरीर निरोगी राहतं तसंच रक्त डिटॉक्स करण्याचं काम केलं जातं. 2. लठ्ठपणा नियंत्रित करते दुधात साखर मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो, तर गूळ मिसळून दूध प्यायल्यास वजन कमी होतं. हे वाचा - WhatsApp वर एखाद्याच्या सततच्या मेसेजने वैताग आला? Block न करताच अशी करा सुटका, पाहा सोपी ट्रिक 3. पचन सुधारते गरम दुधात गूळ मिसळून प्यायल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर राहतात. तुमची पचनशक्तीही चांगली होते. 4. सांधेदुखीपासून आराम सांधेदुखी दूर करण्यासाठीही हे पेय खूप उपयुक्त आहे. गूळ खाल्ल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. 5. त्वचा निरोगी बनते गरम दूध आणि गुळाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. याच्या सेवनामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहते. हे वाचा - गुजराथी उद्योगपतीच्या मुलाचं शाही लग्न; पत्रिकेचं वजनच फक्त 4 किलो 280 ग्रॅम! पाहा PHOTOS 6. महिलांचा पाळीमधील त्रास कोमट दुधात गुळ मिसळून प्यायल्याने महिलांना पीरियड क्रॅम्पच्या त्रासापासून आराम मिळतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)