JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Banana Peel Benefits : केळीच्या सालींमध्येही असतात इतके पोषक घटक, वाचून केळासोबत सालही खाल

Banana Peel Benefits : केळीच्या सालींमध्येही असतात इतके पोषक घटक, वाचून केळासोबत सालही खाल

Banana Peel Benefits: केळी खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण आता या साली फेकण्याअगोदर त्यामध्ये असलेले भरपूर गुणधर्म जाणून घ्या. सालींपासून शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये तर मिळतातच, त्यासोबतच वजन कमी करण्यासही ते उपयुक्त ठरतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 डिसेंबर : केळी (Banana) हे सर्व-सामान्यांचे फळ म्हणून ओळखलं जातं. केळी हे विविध गुणांनी समृद्ध फळ आहे. केळी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, केळ्यांप्रमाणेच केळीची साले (Banana Peel) देखील खूप फायदेशीर आहेत. केळी खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण आता या साली फेकण्याअगोदर त्यामध्ये असलेले भरपूर गुणधर्म जाणून घ्या. सालींपासून शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये तर मिळतातच, त्यासोबतच वजन कमी करण्यासही ते उपयुक्त (Banana Peel Benefits) ठरतात. हे आहेत केळीच्या सालीचे फायदे केळीच्या सालीमध्ये असलेले ल्युटीन डोळ्यांतील मोतीबिंदू रोखण्यास मदत करते. त्यात व्हिटॅमिन ए देखील आढळते. शरीराची प्रतिकारशक्ती सुधारून रोगांशी लढण्यास मदत होते. केळीच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी असते. विशेषत: केळीच्या सालीचा वापर करून व्हिटॅमिन बी-6 ची कमतरता भरून काढता येते. केळीच्या सालीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. ते पचन प्रक्रिया मंदावून शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. हे वाचा -  व्यक्तीने दिली खोटी माहिती आणि बँकेकडून मिळाले 12 कोटी; आता आयुष्यात करतोय ऐश याच्या वापराने शरीरात आवश्यक पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. केळीच्या हिरव्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो, जो एक अमिनो आम्ल असतो. रात्री चांगली झोप येण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. केळीचे गुणधर्म केळीची साल इतकी फायदेशीर आहे, त्यामुळे केळी किती फायदेशीर असेल याचा अंदाज येतो. केळी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हृदय विकारांसह केळीच्या वापराने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते. केळीमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते पचनसंस्थेसाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते. हे वाचा -  उद्या 1 डिसेंबरपासून होणार ‘हे’ पाच बदल; काय होतील परिणाम? मेंदूसाठीही केळी फायदेशीर आहे. केळीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. अशा स्थितीत हाडांच्या मजबुतीसाठी खूप मदत होते. केळी हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. रिकाम्या पोटी केळी खाणे शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या