JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना काळात शरीर मजबूत बनवणारं AYUSH चे 3 खास किट आता ऑनलाईन; घरपोच मिळणार आयुर्वेदिक औषधं

कोरोना काळात शरीर मजबूत बनवणारं AYUSH चे 3 खास किट आता ऑनलाईन; घरपोच मिळणार आयुर्वेदिक औषधं

आयुष आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी तयार केलेले आयु-संरक्षण किट, बाल-संरक्षण किट आणि आरोग्य रक्षा या तीन किटचं आतापर्यंत मोफत वाटप केलं जात होतं. आता ती अॅमेझॉनद्वारे सर्वसामान्यांना वितरित केली जाणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : कोरोना महामारीच्या काळात आयुष मंत्रालयानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकांना आतून बळकट करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, आयुष मंत्रालयानं तीन विशेष किट तयार केल्या आहेत, ज्या आता ऑनलाइन देखील उपलब्ध होतील. आयुष आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी तयार केलेले आयु-संरक्षण किट, बाल-संरक्षण किट आणि आरोग्य रक्षा या तीन किटचं आतापर्यंत मोफत वाटप केलं जात होतं. आता ती अॅमेझॉनद्वारे सर्वसामान्यांना वितरित केली जाणार आहेत. ही किट विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे देखील उपलब्ध असतील. ही किट म्हणजे 3-4 आयुर्वेदिक औषधांचे कॉम्बो-पॅक आहेत. यामध्ये समशामणी वटी, अनु तैला, आयुष काढा आणि च्यवनप्राश आदींचा समावेश आहे. आयुर्वेद उत्पादनांसाठी समर्पित स्टोअरफ्रंट Amazon.in मार्केटप्लेसवर केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात लॉन्च केले आहे. या स्टोअरफ्रंटमध्ये लहान व्यवसाय आणि स्टार्टअप ब्रँड्समधील आयुर्वेदिक उत्पादनं, विविध प्रकारचे ज्यूस, त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्पादनं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी उत्पादनं, विविध प्रकारची तेले असतील. यांची खरेदी करणं आता सोपं होईल. हे वाचा -  Winter Health: घशात दुखत असेल तर चुकूनही खाऊ नका या गोष्टी; तब्येत जास्तच खालावेल यादरम्यान सर्बानंद सोनोवाल म्हणाले, ‘कोविड-19 साठी आयुर्वेद, सिद्ध, होमिओपॅथी औषधे शास्त्रोक्त पद्धतीनं तयार करणं महत्त्वाचं आहे. तसंच, ही उत्पादनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मजबूत विपणन नेटवर्क तयार करणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे काम अॅमेझॉननं त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सोपं झालं आहे. यामुळं आयुषला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनविण्यासाठी छोट्या आणि मोठ्या कंपन्यांना तसेच स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल. हे वाचा -  Liver Healthy: लिवर खराब होणं म्हणजे संपलं..! निरोगी आरोग्यासाठी आधीपासूनच अशी घ्या काळजी आयुष मंत्रालयानं घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे 2014 मध्ये आयुषचा व्यापार 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 18 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. सरकारनं आयुष उत्पादन क्षेत्रासह आयुष उत्पादानांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी पावलं उचलली आहेत. आयुर्वेद हा नेहमीच भारतीय जीवनशैलीचा एक भाग राहिला आहे. भारत सरकार आयुर्वेदाबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर भर देत आहे, असं अ‌ॅमेझॉन इंडियाचे इंडिया कंझ्यूमर बिझनेसचे कंट्री मॅनेजर मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे. हे स्टोअरफ्रंट या दृष्टीकोनासाठी योगदान देण्यासह ग्राहकांना आयुर्वेदिक उत्पादनं अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या