नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : अलिकडं आपण सगळे औषधांवर खूप पैसे खर्च करू लागलो आहे. साध्या शिंका-खोकल्यापासून ते डोकेदुखीपर्यंत आपण औषधं खातो. औषधं खाण्याची वेळ येणं आरोग्यासाठी चागलं नाही. काहींचा विश्वास बसणार नाही मात्र, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला गूळ (Jaggery) आणि हरभरे (Roasted Black Gram) नियमित खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या होत नाहीत आणि आपण निरोगी राहतो. हरभरा-गूळ खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भाजलेले हरभरे आणि गूळ दोन्ही शरीरात ऊर्जा निर्माण करतात, त्यामध्ये आढळणारे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, गुळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. दुसरीकडे, हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, लोह, व्हिटॅमिन-बी सोबत अनेक घटक असतात. हे सगळे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर (Benefits Of Roasted Black Gram Jaggery) असतात. प्रतिकारशक्ती वाढते जेव्हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा विचार येतो तेव्हा अनेक प्रकारच्या गोळ्यांपेक्षा पोषक तत्वांनी युक्त आहार एक चांगला पर्याय मानला जातो. आपण दररोज जे पदार्थ खातो ते भरपूर प्रमाणात पोषक असतात आणि त्यात गुणधर्म असतात जे सर्व प्रकारचे रोग बरे करण्यास मदत करतात. तुम्हाला फक्त योग्य वेळी योग्य अन्न खाण्याची गरज आहे. गूळ आणि काळे भाजलेले हरभरे (गुळ आणि हरभरे) पोषक तत्वांनी समृद्ध असून शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामुळे अनेक प्रकारचे जुनाट आजार होण्यापासून रोखू शकतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. यासाठी दररोज मूठभर भाजलेल्या हरभऱ्यासोबत थोडासा गूळ खावा. हे वाचा - संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी डाळी बनवताना करा या 3 गोष्टी; कुटुंब राहील निरोगी पोषक तत्वे पूर्वी भारतीय घरांमध्ये संध्याकाळी नाश्त्यात गूळ आणि चणे किंवा शेंगदाणे खाणे ही एक सामान्य गोष्ट होती. ही परंपरा तुमच्या घरात शतकानुशतके पाळली जात असल्याचे तुम्ही ऐकले असेल. गुळ आणि चणे एकत्र मिसळून खाल्ल्याने ते सुपर फूड म्हणून काम करतात. या दोन्ही गोष्टी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहेत. भाजलेले हरभरे हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे आणि गूळ हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. याशिवाय गुळात झिंक आणि सेलेनियम भरपूर असते आणि भाजलेल्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, सी, फोलेट, नियासिन, थायामिन, रिबोफ्लेविन, मँगनीज, फॉस्फरस, लोह आणि तांबे यांसारख्ये इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे खाद्यपदार्थ दीर्घ काळापासून भारतीय आहाराचा एक भाग आहेत आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले गेले आहे. गूळ आणि भाजलेले हरभरे या दोन्हीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे झिंक आढळते, जे शरीरातील 300 एंजाइम सक्रिय करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे वाचा - कपाळावरील पिंपल्स घालवण्याचे हे उपाय करून पाहा; घरच्या-घरी दिसेल जबरदस्त परिणाम रात्री झोपण्यापूर्वी हरभरा गूळ खा श्वसन प्रणालीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे अन्नपदार्थ एक रामबाण उपाय आहेत. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडे भाजलेले हरभरे-गुळ खाण्याचा फायदा होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती वैद्यकीय जागृतीसाठी आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)