JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Amino Acid Deficiency: अमिनो अ‍ॅसिड्सला हलक्यात घेऊ नका; शरीरात कमी झालं तर होईल मोठा घोळ

Amino Acid Deficiency: अमिनो अ‍ॅसिड्सला हलक्यात घेऊ नका; शरीरात कमी झालं तर होईल मोठा घोळ

Amino Acid Deficiency: शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. यातील एक पोषक घटक म्हणजे अमिनो आम्ल. त्याच्या कमतरतेचे आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात ते जाणून घेऊ.

जाहिरात

अमिनो अ‍ॅसिड्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : शरीराला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं आवश्यक असतात. त्यापैकी एकाचंही प्रमाण कमी झालं, तरी शरीराला अपाय होऊ शकतो. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्त्वांची गरज असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे अमिनो अ‍ॅसिड्स. अमिनो अ‍ॅसिड्सच्या कमतरतेमुळे आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतो आणि ती कमतरता कशी दूर करायची, याबद्दल जाणून घेऊ या. कमतरतेचे परिणाम - एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अमिनो अ‍ॅसिड्सची कमतरता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो. तसंच, त्या व्यक्तीची आयक्यू पातळी कमी होऊ शकते. - अमिनो अ‍ॅसिड्सच्या कमतरतेचा इम्युनिटीवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांचा संसर्ग सहज होऊ शकतो. - हाडं आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. ऑस्टिओपोरॉसिसही होऊ शकतो. - ब्लड प्रेशरवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणत्या खाद्यपदार्थांत असतात अमिनो अ‍ॅसिड्स? शरीरात अमिनो अ‍ॅसिड्सची कमतरता असेल, तर काही विशिष्ट खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करून ती भरून काढता येऊ शकते, असं ‘हेल्थलाइन’च्या लेखात म्हटलं आहे. ते पदार्थ कोणते याबद्दल जाणून घेऊ या. शाकाहारी पदार्थ : शाकाहारी व्यक्तींनी शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, अ‍ॅव्होकॅडो, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, बदाम, डाळी, ब्राउन राइस, तिळाचं तेल, गाजर, चिया सीड्स आणि होल ग्रेन्स आदींचा आहारात समावेश करावा. मांसाहारी पदार्थ : मांस, मत्स्याहार, अंडी आदींचा आहारात समावेश करून अमिनो अ‍ॅसिड्सची कमतरता भरून काढता येऊ शकते. वाचा - पावसाळ्यात घरभर माश्या भिरभिरतात? मग 1 सोपा उपाय हा त्रास करतील दूर अमिनो अ‍ॅसिड्सचे उपयोग : - सांधे किंवा स्नायूंमध्ये सूज आली असेल, तर ते बरं होण्यासाठी अमिनो अ‍ॅसिड्स उपयुक्त ठरू शकतात. स्नायूंना आलेली सूज यामुळे कमी होते. त्यामुळे आराम पडतो. - अमिनो अ‍ॅसिड्सचा आहारात समावेश असेल, तर लठ्ठपणा कमी होण्यास हातभार लागू शकतो. फॅट्ससोबतच शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी अमिनो अ‍ॅसिड्स उपयुक्त ठरतात, असं संशोधनांतून दिसून आलं आहे. पोटाजवळ जमा झालेलं फॅट यामुळे कमी होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या