JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Best Oils For Hair: फक्त खोबरेल तेलच नाही, थंडीच्या दिवसात हे 5 तेल केसांना देतील संपूर्ण पोषण

Best Oils For Hair: फक्त खोबरेल तेलच नाही, थंडीच्या दिवसात हे 5 तेल केसांना देतील संपूर्ण पोषण

Hair Care Tips For Winter: हिवाळ्यात केसांच्या समस्या वाढतात. त्यामुळं त्यांची योग्य काळजी घेण्याची गरजही यावेळी अधिक असते. आपण सर्वजण घरच्या घरी केसांचं आरोग्य आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जानेवारी : हिवाळ्यात आपले केस कोरडे होऊ लागतात. यासोबतच आपल्या डोक्याच्या त्वचेमध्ये कोरडेपणाची समस्याही येते. तसंच कोंडा आणि केस तुटण्याची किंवा गळण्याची तक्रार असते. एकूणच हिवाळ्यात केसांच्या समस्या वाढतात. त्यामुळं त्यांची योग्य काळजी घेण्याची गरजही यावेळी अधिक असते. आपण सर्वजण घरच्या घरी केसांचं आरोग्य आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. त्यापैकी केसांना तेल लावणं हा देखील एक चांगला (Hair Care Tips For Winter) उपाय आहे. बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांना हळुवारपणे कोणत्याही चांगल्या तेलानं मालिश केल्यानं त्यांच्यातील रक्ताभिसरण चांगलं होतं. यासोबतच, ते मजबूत होतात आणि केसांमध्ये चमकही टिकून राहते. यामुळं आपल्याला एक खोल मानसिक शांतीदेखील मिळते. पण हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी कोणतं तेल चांगलं आहे, असा प्रश्न पडतो. केसांची काळजी घेण्यासाठी 5 प्रकारच्या तेलांची माहिती घेऊ. केसांसाठी तेल खोबरेल तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असल्यामुळं खोबरेल तेल हिवाळ्यात होणार्‍या कोंड्यासारख्या समस्या दूर करतं. हे आपल्या केसांचा ओलावा आणि चमकदेखील टिकवून ठेवतं. केसांच्या आरोग्यासाठी हे तेल खूप पूर्वीपासून वापरलं जात आहे. आयुर्वेदातही खोबरेल तेलाचे गुणधर्म सांगितले आहेत. कोमट खोबरेल तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं हिवाळ्यातही केस मजबूत आणि मुलायम राहतात. याशिवाय, खोबरेल तेलात दाह-विरोधी गुणधर्म देखील असतात. म्हणूनच केसांना कोरडेपणा आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम मानलं जातं. बदाम तेल बदामाच्या तेलात व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असतं. शिवाय, त्यात चिकटपणा नसतो. म्हणजेच, केसांसाठी याचा वापर करणं प्रत्येक प्रकारे सुरक्षित आहे. बदामाचं तेल केसांना पोषण देतं आणि त्यांना मऊ-मुलायम बनवतं. बर्‍याच तज्ज्ञांनी बदामाचं तेल भृंगराज तेलात समान प्रमाणात मिसळून डोक्याला मालिश करण्याचा सल्ला दिला आहे. केसांच्या वाढीसाठी ही एक प्राचीन कृती आहे. याशिवाय बदामाचं तेल केसांमधील कोंडाही दूर करते. त्यामुळं हिवाळ्यात डोक्याला बदामाचं तेल लावल्यानं या काळात केसांशी संबंधित जवळपास सर्व समस्या सहज दूर होतात. तिळाचं तेल तिळाचं तेल डोक्याच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तिळाचं तेल कोमट करून केसांच्या मुळांना मालिश केल्यानं केस मजबूत होतात. यासोबतच केसांची वाढही वेगानं होते. तसंच, त्यांना कोणताही संसर्ग होत नाही. तिळाच्या तेलाच्या वापरानं केसांमध्ये कोंडा आणि तुटण्याची समस्या होत नाही. त्यामुळं, विशेषत: हिवाळ्यात, तिळाच्या तेलानं टाळूची मालिश केल्यानं केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात एरंडेल तेल एरंडेल तेल प्रोस्टॅग्लॅंडिन नावाच्या संप्रेरकाच्या उत्सर्जनास प्रतिबंध करतं. हे संप्रेरक केस गळण्याचं प्रमुख कारण असतं. मात्र, तुमच्या केसगळतीची समस्या प्रोस्टॅग्लॅंडिन हार्मोन्सच्या जास्त स्रावाशी संबंधित आहे. परंतु, एरंडेल तेलात इतर महत्त्वाचे गुणधर्म आहेत. केसांची वाढ होण्यासाठी आणि केस गळणं रोखण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. त्यामुळं केसांचं आरोग्य राखण्यासाठी केसांच्या मुळांना एरंडेल तेलानं मालिश करणं खूप फायदेशीर ठरतं. हे वाचा -  टक्कल पडण्याची भीती दिवस-रात्र सतावतेय? केस गळती थांबवण्यासाठी मेथी-कांद्याचा असा करा वापर ऑलिव्ह तेल बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असलेल्या ऑलिव्ह ऑइलमध्ये सर्व प्रकारची चांगल्या फॅटी अॅसिडस आणि व्हिटॅमिन-ई देखील आढळतात. त्यामुळं मालिश केल्यावर केसांच्या मुळांना विशेष पोषण मिळतं आणि ती सुरक्षित राहतात. यामध्ये आढळणारं ओलेइक अॅसिड केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावतं. त्यामुळं ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास विशेषतः हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा किंवा कोंडा आणि केस तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या