प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 27 जानेवारी : कोणत्याही व्यक्तीच्या राशीवरून त्याच्याबद्दल जाणून घेता येतं. त्याचप्रमाणं नावाच्या पहिल्या अक्षराच्या (First letter of the name) आधारेही बरंच काही जाणून घेता येतं. इथं आपण अशा 3 अक्षरांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अक्षरांनी ज्या मुलींच्या नावांची सुरुवात होते, त्या मुली वर्चस्व गाजवणाऱ्या मानल्या जातात. या अक्षरांनी नावांची सुरुवात होणाऱ्या मुली/महिला नेहमीच त्यांच्या लव्ह पार्टनरवर (Love Partner) वर्चस्व गाजवतात. घर असो की ऑफिस, यांच्यासमोर कोणाचंही काहीही चालत नाही. जाणून घ्या, कोणती आहेत ही अक्षरं… नावाची सुरुवात A अक्षरानं होणाऱ्या मुली : ज्या मुलींचं नाव A नं सुरू होतं, त्या धैर्यवान आणि मेहनती असतात. एकदा त्यांनी एखादं काम करायचं ठरवलं की त्या ते पूर्ण करतातच. या मुलींना प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला आवडते. कोणाचंही सहकार्य घेणं त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते. नात्यातही किंवा प्रेमसंबंधातही त्यांना स्वतःचं वर्चस्व गाजवायला आवडतं. त्यांचा स्वभाव खूप अधिकार गाजवणारा मानला जातो. हे वाचा - लॉक झालंय Gmail Account? अशाप्रकारे पुन्हा करा सुरू, आहेत सोप्या स्टेप्स नावाची सुरुवात C अक्षरानं होणाऱ्या मुली : ज्या मुलींचं नाव C या अक्षरानं सुरू होतं, त्या स्वच्छ हृदयाच्या मानल्या जातात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनं करायला आवडते. त्यांच्यासमोर कोणाचंही चालत नाही. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. नात्याशी किंवा प्रेमसंबंधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णयही त्या स्वतः घेतात. त्यांच्यासमोर त्यांच्या जोडीदाराचं अजिबात चालत नाही. हे वाचा - क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळतेय जान्हवी कपूर, दिनेश कार्तिकसोबत शेअर केले PHOTO नावाची सुरुवात L अक्षरानं होणाऱ्या मुली : या नावाच्या मुली आपल्या प्रियकरावर खूप प्रेम करतात. त्या त्यांच्या प्रियकराबद्दल खूप सकारात्मकही असतात. त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. त्यांना रिलेशनशिपमध्ये स्वतःचं खरं करायला आवडतं. त्यांच्यासमोर त्यांच्या जोडीदाराचं अजिबात चालत नाही. त्या त्यांच्या पतीवर वर्चस्व गाजवतात.