JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Friendship Benefit : 'तेरी मेरी यारी आणि....'; मित्रमैत्रिणींची भेट मानसिक आजारांवरही पडते भारी

Friendship Benefit : 'तेरी मेरी यारी आणि....'; मित्रमैत्रिणींची भेट मानसिक आजारांवरही पडते भारी

आपल्या आयुष्यात मित्रांना खूप महत्त्व आहे. ते आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्यासोबत असतात. यामुळेच आपल्या भावना त्यांच्याशी घट्ट जोडलेल्या असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 सप्टेंबर : लहानपणापासून कॉलेजपर्यंत आणि नंतर व्यावसायिक जीवनात आपले अनेक मित्र बनतात. आपण सर्व प्रकारच्या गोष्टी मित्रांसोबत शेअर करतो आणि ते आपल्याला अडचणीत मदत करतात. आपल्या आयुष्यात मित्र असणे खूप महत्वाचे आहे. काही लोकांचे मित्र मंडळ खूप मोठे असते, तर काही लोक निवडक मित्र बनवतात. मात्र आपल्या जुन्या मित्रांवर आपला सर्वात जास्त विश्वास असतो. ‘ओल्ड इज गोल्ड’ ही म्हण जुन्या मित्रांसाठी अगदी योग्य आहे. आजच्या काळात प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत आहे, त्यात मित्रांना भेटणे कमी झाले आहे. याचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण या गोष्टी खऱ्या आहेत. जुन्या मैत्रीचा मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. याबाबतचा एक अभ्यास समोर आला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. जुने मित्र सुधारतात मानसिक आरोग्य हेल्थलाइनच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जुन्या मित्रांना भेटणे लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. असे केल्याने त्यांची मानसिक स्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारते. इतकंच नाही तर फोन कॉल, ईमेल किंवा टेक्स्टिंगचाही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. कोरोना महामारीनंतर जुन्या मित्रांचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोरोनामुळे बहुतांश लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून जावे लागले आहे. विशेषत: वृद्धांना या समस्यांना सर्वाधिक सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लहान लहान गोष्टींमुळेही मानसिक आरोग्य सुधारू शकते. हे सर्व वयोगटातील लोकांना लागू होते.

Life@25: प्रत्येक मुलीला आवडतील अशी 5 बेस्ट ठिकाणं, Girls Trip साठी आहेत अतिशय खास

असा करण्यात आला अभ्यास हा अभ्यास अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने (एपीए) प्रकाशित केला आहे. यामध्ये सुमारे 6000 लोक सहभागी झाले होते. या लोकांचा डेटा गोळा केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. असे दिसून आले की आपण बर्याच काळापासून संपर्कात नसलेल्या जुन्या मित्रांशी बोलणे खूप आनंददायक आहे. असे केल्याने दोन्ही लोकांच्या भावना वाढतात आणि लोकांचे मानसिक आरोग्य सुधारते. एकमेकांना भेटून आणि बोलूनही चिंता आणि नैराश्य खूप कमी होऊ शकते. लोकांमध्ये एकटेपणाची भावनादेखील आरोग्यासाठी खूप धोकादायक मानली जाते.

Life@25 : अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकाराल तर याल अडचणीत; तरुणांनी घ्यायला हवी ‘या’ 5 गोष्टींची काळजी

संबंधित बातम्या

कोरोनामुळे झालाय मानसिक आरोग्यावर परिणाम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कोरोनामुळे जगभरात नैराश्य आणि चिंताग्रस्त होण्याच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की कोविड महामारीमुळे 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. लोक एकमेकांपासून सामाजिकदृष्ट्या दूर झाले आहेत आणि वृद्धांमध्येही एकटेपणाची भावना वाढली आहे. त्यामुळेच एकमेकांना भेटणे खूप गरजेचे झाले आहे. तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, जुन्या मित्रांना कॉल करा आणि गेट टुगेदर आयोजित करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या