मुंबई, 3 सप्टेंबर: सोशल मीडियाची (Social Media) व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. आजकालची तरूणाईतर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुटून पडलेली असते. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक छळासाठीही होत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: महिला आणि तरुणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लैंगिक छळाच्या बळी ठरतात. संधी मिळताच तरूणींचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या लोकांची कमी नाही. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरूणींची फसवणूक करतात. फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत अशा काही महिला आणि पुरुषांच्या टोळ्या आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या व्यवसायाच्या किंवा व्यवहाराच्या नावाखाली तरुण-तरुणींची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. बनावट खात्याच्या माध्यमातून हे लोक तरुणाईला लक्ष्य करतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात परदेशी महिलांनी प्रथम फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर मैत्री करतात आणि नंतर फसवणूक केली जाते. अशा धक्क्यानं तरूण तरूणी नैराश्याच्या गर्तेत अडकतात.
- अनोळखी लोकांशी मैत्री करू नका-
कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका किंवा फॉलो करू नका, मग ते फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम. जोपर्यंत एखादी व्यक्ती म्युच्युअल फ्रेंड्समध्ये नसेल तर अशा विनंत्या स्वीकारू नका. ज्या व्यक्तीबद्दल कोणतीही खास माहिती नाही अशा व्यक्तीच्या एक-दोन गोष्टींनी प्रभावित होऊन त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं योग्य होणार नाही.
- इनबॉक्समध्ये विनाकारण बोलू नका-
फेसबुकवरील मेसेंजरमध्ये तरुणींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. योग्य व्यक्ती शक्यतो गरज पडेल तेव्हाच संवाद साधण्यासाठी मेसेंजरचा वापर करतात, पण बहुतांश महिला आणि मुलींना खूप वाईट अनुभव आला आहे. लोक त्यांना अश्लील मेसेज पाठवू लागतात. अश्लील चित्रे आणि व्हिडिओ देखील पाठवतात. त्यामुळे मेसेंजरवर जास्त बोलू नका.
- सायबर गुन्हे विभागाला कळवा-
जर तुम्हाला सोशल मीडियावर मेसेंजरमध्ये अश्लील संदेश, इमोजी, चित्र किंवा व्हिडिओ पाठवला गेला असेल, तर असे करणाऱ्यांना सायबर कायद्यांतर्गत शिक्षा होऊ शकते. पण असे लोक खूप चलाख असतात. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हे लक्षात येताच त्यांनी लगेच चॅट डिलीट करून खातं बंद करतात. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई शक्य आहे. हेही वाचा- Life@25 : “बायको माझ्यापेक्षा जास्त कमावते म्हणून सर्वजण माझी खिल्ली उडवतात”
- तुमचा मोबाईल नंबर देऊ नका-
तुमचा मोबाईल नंबर कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक वगळता कोणालाही देऊ नका. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अनेक लोक मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअॅप नंबर विचारतात. प्रत्येकजण वाईट नसतो, परंतु कोण कसा आहे हे सांगणं कठीण असतं. त्यामुळं सोशल मीडियावरील मैत्री तशीच राहू द्या. मोबाईल नंबर दिल्यानं तुमची समस्या वाढू शकते. विशेषत: महिलांना अधिक छळाला सामोरं जावं लागतं.
- पैसे देऊ नका, व्यावसायिक सौद्यांमध्ये अडकू नका-
सोशल मीडियावर असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागतात. ते वचन देतात की ते लवकरच पैसे परत करतील आणि त्यांचा बँक खाते क्रमांक देखील शेअर करतात. एखाद्या व्यक्तील खरंच गरज असू शकते. परंतु तरीही सावधगिरी बाळगणं महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा कोणी बिझनेस प्लॅनमध्ये सामील होण्याबद्दल बोलत असेल तर सावधगिरी बाळगा. अनेक तरुण याला बळी पडतात आणि त्यांची मोठी फसवणूक होऊ शकते. जर कोणी तुम्हाला परदेशातून भेटवस्तू पाठवण्याबद्दल बोलत असेल तर विशेष सावधगिरी बाळगा आणि अशा फ्रेंड्सपासून दूर राहा. भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तुमची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकते.