JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai News : किम जोंग यांनी ज्या देशासोबत घेतला पंगा, तिथून आले खास पदार्थ मुंबईमध्ये? इथं भरलंय मार्केट VIDEO

Mumbai News : किम जोंग यांनी ज्या देशासोबत घेतला पंगा, तिथून आले खास पदार्थ मुंबईमध्ये? इथं भरलंय मार्केट VIDEO

कोरियन पदार्थांची खरेदी करण्यासाठी हे मार्केट बेस्ट पर्याय आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : मुंबई म्हटलं की वडापाव आठवतो. पण वडापाव बरोबरच मुंबईमध्ये वेगवगेळ्या राज्याची आणि विदेशातील खाद्यसंस्कृतीही मुंबईत चांगलीच लोकप्रिय आहे. या ठिकाणच्या पदार्थांचा लोक आवडीने आस्वाद घेत असतात. यामध्ये कोरियन फुडचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या पदार्थांची खरेदी तुम्ही मुंबईत कुठे करू शकता याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. कुठे करता येईल खरेदी? मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट या परिसरात तुम्ही कोरियन पदार्थांची खरेदी करू शकतात. क्रॉफर्ड मार्केटमधील अंकल्स शॉप या दुकानात तुम्हाला 50 पेक्षाही अधिक वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन पदार्थ सीलबंद पाकिटात मिळतील. या दुकानाचे मालक मोहम्मद सोहिल आहेत. गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणी ते कोरियन पदार्थांची विक्री करत आहेत.

कोणते पदार्थ मिळतात? स्पाइस हॉट चिकन रामेन, रामेन नूडल्स, तोपोक्की, किमची, गोचुजंग मसाला, पालडो राइस पंच, हाबनेरो नूडल, जीन रामेन, इओमुक, उदोंग नूडल्स, बिबीमेन नूडल्स, बुल्डक सॉस, ताओ-काए-नोई सिवीड फ्लेक्स, जंगमेन नूडल, बनाना मिल्क, मॅक्सिम कॉफी, पॉकी बिस्किट स्टीक, गोचुगरू चिली फ्लेक, जिंजू राइस क्रॅकर, टोफू, बीबींबाप, बुलगोगी, संग्योपसाल, मांडू डंपलिंग असे अनेक प्रकारचे कोरियन पदार्थ येथे उपलब्ध आहेत. त्याच बरोबर या पदार्थांना बनवतांना लागणारे साहित्य म्हणजेच तेल, वेगवेगळे मसाले, चोपस्टिक्स, बाउल या दुकानात उपलब्ध आहेत.

केरळचा स्क्विड मासा, अळकुड्या वेफर्स खाल्ले का? पुण्यात इथं आहे खास बाजार

संबंधित बातम्या

काय आहे किंमत? येथे रामेन नूडल्सचे विविध प्रकार खऱ्या एमआरपी पेक्षा 20 टक्के कमी दरात या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर कोरियाचे विविध नूडल्स हे 90 रुपयांपासून ते 130 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कोरियाचे फेमस राइस केक हे 280 रुपयांपासून ते 450 रुपयापर्यंत येथे मिळतात. कोरियामध्ये विविध स्नॅक्स प्रकार मिळतात ते या ठिकाणी 70 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, अशी माहिती अंकल्स शॉप या दुकानाचे मालक मोहम्मद सोहिल यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या