JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुंबईच्या पावसात कधी खाल्लाय का चीज वडापाव? 2 मैत्रिणींनी सुरू केला M.A. वडापाव

मुंबईच्या पावसात कधी खाल्लाय का चीज वडापाव? 2 मैत्रिणींनी सुरू केला M.A. वडापाव

दोन मैत्रिणींनी मिळून एम.ए. वडापाव सुरु केला आहे. या वडापाव स्टॉलवर विविध प्रकारचे वडापाव मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे मुंबईतील दोन मैत्रिणींनी मिळून एम.ए. वडापाव सुरु केला आहे. कोणी सुरु केला? मुंबईतील मालाड परिसरात दोन मैत्रिणीं अंकिता ठाकूर आणि काजल शेट्टी यांनी एम.ए. वडापाव सुरू केला आहे. काजल आणि अंकिता या दोन मैत्रिणी स्वतःच काही तरी करायचं या दृष्टीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. दोघींनी पदवीचं शिक्षण घेऊन आपल्या आपल्या क्षेत्रात 5 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे. मात्र गप्पा मारत असताना स्वतःच काही तरी असावं यासाठी दोघींनी विचार करून घरच्यांशी चर्चा करून एम. ए. वडापाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वडापाव स्टॉलवर विविध प्रकारचे वडापाव मिळतात. आणि घरगुती पद्धतीची चव असल्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी, दुकानदार, बँकेतील कर्मचारी, चालता फिरता फिरणारी मंडळी या वडपावला पसंती देताना पाहायला मिळतात.

छोटा वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला काजल शेट्टी सांगते की, मुंबई म्हंटल की डोळ्यासमोर मुंबईचा प्रसिध्द वडापाव येतो. आम्ही दोघी मैत्रिणी विविध क्षेत्रात काम करत होतो. मात्र समाधान मिळत नसल्याने आणि स्वतःच काही तरी करायचं या दृष्टीने आणि छोटा वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला नाव काय ठेवायचं असा विचार करत असताना अचानक मी आत्मनिर्भर असं नाव मैत्रिणीने सुचवलं आणि तिथून एम. ए. वडापावची सुरुवात झाली.

कमी साहित्यात झटपट तयार करा दही धपाटे, अस्सल मराठवाडी पदार्थाची पाहा Recipe

संबंधित बातम्या

आज मुंबईतील कानाकोपऱ्यातून ग्राहक येत असतो. आमच्याकडे चीज वडापाव, उलटा वडापाव, साधा वडापाव, चीज उलटा वडापाव असे प्रकार मिळत असून 16 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत किंमत आहे. येत्या काळात हा व्यवसाय आणखी चांगल्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही दोघी करत आहोत. त्यामुळे लवकरच दुकान सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचं काजल सांगते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या