JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हात न लावता भरणार पाणीपुरी, ठाणेकराने आणलं सेन्सर पाणीपुरी मशीन, अशी तयार होते प्लेट! VIDEO

हात न लावता भरणार पाणीपुरी, ठाणेकराने आणलं सेन्सर पाणीपुरी मशीन, अशी तयार होते प्लेट! VIDEO

पाणीपुरी खाताना स्वच्छतेची काळजी कमी होणार आहे. कारण, आता हात न लावता पाणीपुरीची प्लेट भरणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी ठाणे, 16 जून :  गोल गप्पा किंवा शुद्ध मराठी भाषेत पाणीपुरी कुणाला नको असते?  वयोवृद्ध आजी आजोबांपासून ते चिमुरड्यांपर्यंत सर्वांचा पाणीपुरी हा आवडता पदार्थ आहे. कधी-कधी अस्वच्छतेमुळे पाणीपुरी खाण्याचा मोह आपण टाळतो. पण, आता तुम्हाला मन मारण्याची अजिबात गरज नाही. कारण, ठाण्यातील एका तरूणाने सेन्सर मशिनच्या मदतीनं पाणीपुरी सुरू केली आहे. ठाण्यातील गोपाळ बस्तीकर या तरुणाने हातांचा वापर न करता सेन्सॉर मशिनच्या मदतीनं पाणीपुरीची विक्री सुरू केलीय. हा भन्नाट प्रकार पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर चवीला अप्रतीम असलेले गोलगप्पे खाण्यासाठी ठाणेकर गोपाळ यांच्या पाचपाखडीतील स्टॉलवर गर्दी करत आहेत.

कशी सुचली कल्पना? गोपाळ हे स्वतः शेअर मार्केटच्या व्यवसाय करतात. त्यांनी पत्नी पूजाचा एखाद्या व्यवसायात जम बसावा या उद्देशानं चाट पदार्थांची विक्री करण्याचं ठरवलं. त्यावेळी चवीला उत्तम आणि स्वच्छ पाणीपुरीची विक्री करण्याचं त्यांनी ठरवलं.  सेन्सॉर मशिनच्या मदतीनं पाणीपुरी ग्राहकांना देणं शक्य आहे, असं गोपाळ यांच्या लक्षात आलं. गोपाळ यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सेन्सर यंत्रणेसंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ बघितले. त्यांनी इलेक्ट्रिक गोष्टींचे छोटे छोटे पार्टस विकत घेतले. यातील काही पार्टस, ठाणे, मुंबई आणि पुणे येथून घेतल्याचे ते सांगतात. त्यानंतर हे पार्टस जोडत जोडत त्यांची पाणी पुरी सेन्सर मशीन तयार झाली. ही मशीन तयार करायला त्यांना 3 महिने लागले. त्याचबरोबर एक ते दीड लाख खर्च आला, अशी माहिती गोपाळ यांनी दिली. कोल्हापुरात मिळतीय चक्क चॉकलेट पाणीपुरी! नादखुळ्या डिशनं बच्चे कंपनी झाली खुळी, Video विशेष म्हणजे हे मशीन कसे बनवले ? आम्हाला पण हवे आहे बनवून द्या अशी मागणी आता ग्राहक करत आहेत. या ग्राहकांनाही मशिन बनवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कशी आहे ही यंत्रणा? पूजा बस्तीकर पुरीमध्ये रगडा किंवा आलू आणि चटणी टाकून देतात. त्यानंतर आपल्याला हवे त्या चवीचे पाणी पुरीत टाकण्यासाठी केवळ हातातील डिश पुढे करायची. सेन्सर असल्यामुळे मशिनला पुरी असल्याची जाणीव होते. या मशिनमधून त चिंचेचे गोड , कमी तिखट आणि तिखट पाणी पूरीत जाते. पाणी संपले की मशीनचा मागच्या बाजूला लावलेले डबे उघडून गोपाळ त्यात तयार केलेले वेगवेगळ्या चवीचं पाणी भरतात. मशीनचा सेन्सर चालला नाही तर एक बटण देखील मशिनला आहे. किती आहे किंमत? बस्तीकर यांच्या स्टॉलवर रगडा पाणीपुरी 30, आलू पाणीपुरी 25 तर शेवपुरी आणि दहीपुरी 40 रुपयांना मिळते. म्ही मिनरल पाणी वापरून सर्व पदार्थ तयार करत असल्याची माहिती पूजा बस्तीकर यांनी दिली. कुठे खाणार - प्रशांत कॉर्नरच्या समोर , पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) कधी - रोज संध्याकाळी 5 ते 9

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या