JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शेवपुरी सँडविच कधी खाल्लं का? एकदा पाहा हा VIDEO

शेवपुरी सँडविच कधी खाल्लं का? एकदा पाहा हा VIDEO

सँडविच म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण शेवपुरी सँडविच कधी ट्राय केलंय का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 17 जुलै: सँडविच म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण याच सँडविच डिशमध्ये काही वेगळेपण मिळत असेल तर त्या ठिकाणी गर्दी देखील बघायला मिळते. मात्र ठाण्यातील अशाच एका पाणीपुरी व सँडविचच्या स्टॉलवर सध्या सँडविच प्रेमींची जास्त गर्दी होताना दिसत आहे. येथे मिळणारा युनिक सँडविच फ्युजन म्हणजेच शेवपुरी सँडविच हा ठाणे करांचा पसंतीस पडत आहे. ठाण्याच्या जोशी बेडेकर शाळेच्या परिसरात असलेले आनंद फूड कॉर्नर हे सध्या आनंद प्रजापती हे चालवतात. त्यांचे वडील गेले 18 वर्षांपासून या ठिकाणी पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. शेवपुरी सँडविच काय आहे प्रकार? शेवपुरी म्हटलं की गोड तिखट शेवयाची पाणीपुरी डोळ्यासमोर येते. आता तीच शेवपुरी प्लेटवर न मिळता चक्क ब्रेडवर मिळणार आहे. आपण आजवर अनेक प्रकारचे सँडविच खाल्ले असतील. टोस्ट सँडविच, ग्रील सँडविच, मसाला सँडविच, साधा सँडविच असे अनेक प्रकार लोक आवडीने खातात. त्याचबरोबर पाणीपुरी देखील लोक चवीने खातात. पण एकाच वेळी सँडविच आणि पाणीपुरीची चव कशी लागेल हे जाणून घेण्यासाठी शेवपुरी सँडविच हा प्रकार एकदा तरी खाऊन बघायला हवा.

कसं बनतं शेवपुरी सँडविच? या शेवपुरी सँडविचचे वैशिष्ट्य म्हणजेच ब्रेडवर बटर व पुदिना चटणी लावून त्यावर शेवपुरीची कडक पुरी ठेवली जाते. त्यावर बटाटा व गोड तिखट पाणी घालून त्यावर शेव घातली जाते. त्याला ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसने बंद केले जाते. या सँडविचला ग्रील मशीन मध्ये टाकून त्याला मस्त खुसखुशीत ग्रील केले जाते व टोमॅटो केचप सोबत सर्व्ह केले जाते. या सँडविचचे वेगळेपणा म्हणजेच येथील पुदिना चटणी व प्रजापती काकांचा हाताची चव आहे. त्याचबरोबर असे अनेक प्रकारचे सँडविच व पाणीपुरी या ठिकाणी ते गेले 18 वर्षांपासून विकत आहेत. इडली, पोहे झाले नेहमीचे, आता घरीच बनवा 5 मिनिटात हा पौष्टिक पदार्थ, पाहा सोपी रेसिपी PHOTOS कोणते पदार्थ उपलब्ध? आनंद फूड कॉर्नर या ठिकाणी पाणीपुरी आणि सँडविचचे विविध प्रकार मिळतात. साधा सँडविच हा 30 रुपयात या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर व्हेज ग्रील आणि आलू बटर ग्रील सँडविच हा 40 रुपयात मिळतो. येथील प्रसिद्ध असलेला शेवपुरी सँडविच हा 45 रुपयात उपलब्ध असून येथील पार्सल सुविधा देखील चांगली आहे. या ठिकाणी अगदी 20 रुपयांपासून सँडविच आणि पाणीपुरी उपलब्ध आहेत. सँडविचचा आगळावेगळा फ्युजन आता शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर पूर्ण ठाणेकरांच्या पसंतीस पडत आहे, अशी माहिती आनंद प्रजापती यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या