लतिका अमोल तेजाळे, प्रतिनिधी ठाणे, 19 जून : आगरी कोळी पद्धतीचे चमचमीत आणि मसालेदार पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक जणांना आवडते. त्यामुळे या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेत्यक जण नवनवीन ठिकाण शोधत असतो. यामुळे ठाण्यामध्ये दोन मैत्रिणींनी एकत्र येत अस्सल आगरी कोळी मेजवाणीचे पदार्थ खवय्यांना खायला मिळावे म्हणून एका स्टॉलची सुरुवात केली आहे. या स्टॉलची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. कोणते पदार्थ मिळतात? प्रणिका तांडेल आणि बॉबी कोळी या दोन मैत्रिणींनी एकत्र येत ठाण्याच्या पूर्वेस अष्टविनायक चौकात आई एकवीरा या नावाने आगरी कोळी पदार्थांच्या मेजवाणीचा स्टॉल सुरु केला आहे. या ठिकाणी डाळ वजरी, सुरमयी, पापलेट, बोंबील, भेजा फ्राय हे पदार्थ खवय्यांना खायला मिळत आहेत. हे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
पदार्थांची किंमत किती? या ठिकाणचे डाळ वजरी, भेजा फ्राय हे पदार्थ इतके प्रसिद्ध झाले आहेत की स्टॉल उघडताच लोक डाळ वजरी आणि भेजाफ्रायची मागणी करतात. या ठिकाणी डाळ वजरी ही 150 रुपये प्लेट आणि भेजा फ्राय 200 रुपये प्लेट आहे. आम्ही वेगवगेळ्या मसाल्याचा वापर करून हे पदार्थ बनवतो. आम्ही आगरी कोळी मेजवाणीचे पदार्थ चांगल्या पद्धतीने खवय्यांना खायला मिळावे यामुळे या स्टॉलची सुरुवात केलेली आहे, असं प्रणिका तांडेल यांनी सांगितले.
फक्त 300 रुपये शिल्लक असताना दाखवलं धाडस, डोंबिवलीकरानं तयार केला वडापावचा ब्रँड, Video
कुठे घेणार पदार्थाचा आस्वाद? ठाण्याच्या पूर्वेस अष्टविनायक चौकात आई एकवीरा नावाने हा स्टॉल आहे. दररोज संध्याकाळी 5:30 ते रात्री 10:30 हा स्टॉल सुरु असतो.