JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा

Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा

मुंबईत आता चक्क टोमॅटो वडापाव मिळतोय… पाहा कसा आहे प्रकार

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई 8 जून : मुंबईकरांना रोजच्या धावपळीत भूक लागल्यानंतर सर्वात प्रथम वडापावची आठवण येते. मुंबईच्या फस्ट लाईफला साजेसा हा पदार्थ मुंबईतच सुरू झाला आणि चांगलाच रूजला. शहराच्या प्रत्येक भागात वडापावचा एकतरी फेमस गाडा आहे. आपला वडापाव इतरांपेक्षा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तो बनवण्यापासून ते त्यामध्ये मिळणाऱ्या चटणीपर्यंत ग्राहकांना वेगळं देण्याचा विक्रेता प्रयत्न करतो. टोमॅटो वडापावची चर्चा वडापावच्या या गर्दीत धारावीत मिळणारा टोमॅटो वडापाव हटके ठरतोय. धारावीतील संत रोहिदास रोडवर महेंद्र काळे हे गेल्या दहा वर्षांपासून वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या  स्टॉलवर वडापाव, सँडविच, भजी पाव असे नेहमीचे पदार्थ मिळतात. त्याचबरोबर येथील टोमॅटो वडापाव देखील चांगलाच फेमस आहे.

टोमॅटोमधील आतला गर काढून घेतल्यानंतर बटाट्याचे मिश्रण आणि काही मसाले टाकून तळला जातो. त्यानंतर पावमध्ये तिखट आणि गोड चटणी लावून तो वडापाव ग्राहकांना दिला जातो. हा हटके वडापाव खाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरातील खवय्ये इथं येतात. सेलिब्रिटींचा अड्डा; Apple चे CEO आणि धक धक गर्लने कुठे खाल्ला 165 रुपयांचा वडापाव? ‘मी गेल्या दहा वर्षांपासून वडापावचा व्यवसाय करतो. आम्ही देखील नेहमीचा वडापाव बनवत होतो. काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. हा वडापाव पाहता-पाहता फेमस झाला आहे. धारावीत मजुरांची संख्या मोठी आहे. त्यांना परवडेल अशी 15 रुपये किंमत या वडापावची आम्ही ठेवलीय, असं महेंद्र यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या