JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आजीपासून मिळाली प्रेरणा, मुंबईकर तरूणीनं दिव्यांग मुलांसह सुरू केला विमानतळावर ‘मिट्टी कॅफे’

आजीपासून मिळाली प्रेरणा, मुंबईकर तरूणीनं दिव्यांग मुलांसह सुरू केला विमानतळावर ‘मिट्टी कॅफे’

हा कॅफे 23 वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : रोज वाढत चाललेल्या स्पर्धेत यशस्वी होणं हे प्रत्येकासमोरचं आव्हान असतं.  त्यामध्ये सर्वांची दमछाक होते. दिव्यांग व्यक्तींच्या तर समस्या या आणखी वेगळ्या असतात. त्यांना नोकरी तसंच रोजगारासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल दोनवर ‘मिट्टी कॅफे’ सुरू करण्यात आलाय. हा कॅफे 23 वेगवेगळ्या  प्रकारच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये दृष्टिदोष, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, बहुविुकलांगता या सारख्या वेगवेगळ्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

मिट्टी कॅफेच्या संचालक अलीना आलम यांनी याबाबतची संकल्पना सांगितली. ‘जग हे फक्त प्रत्येकाच्या योग्यतेवर ओळखलं जावं असं माझं स्वप्न आहे. माझी आजी दिव्यांग होती. त्यांनी मला मोठं केलं. पण, एक नात म्हणून तिच्याकडं पाहत असताना मला नेहमी त्यांच्यातील क्षमता दिसत असे. तिनं आम्हाला नेहमीच मदत केली. एका तिकीटासाठी रात्रभर होते उभे, मनाशी ठरवलं अन् 85 वर्षांचे भाऊ करताय लालपरीची सेवा खाण्याच्या माध्यमातून आपण लोकांना एकमेकांना जोडू शकतो. त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. त्यांच्यात जागृती करू शकतो. या संकल्पनेतून सुरू झालेल्या मिट्टी कॅफेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी चांगली जागा असू शकत नाही. या विमानतळावर जगभरातील लोकं प्रवास करतात. त्यामुळे जगभर आमचा संदेश जाईल,’ असं त्यांनी सांगितलं. ‘मिट्टी कॅफे’ त प्रवाशांना सॅण्डविच, पास्ता, समोसा असे पदार्थ, तसेच हॉट आणि कोल्ड ड्रिंक मिळणार आहे. त्याचबरोबर ब्रेलमध्ये छापलेल्या मेन्यूकार्डमधूनही त्यांना ऑर्डर देता येईल. अटेन्डन्टसशी संवाद साधण्यासाठी छोट्या फलकांचा वापर करता येणार आहे. तसंच सांकेतिक भाषेतील मेन्यू तसंच प्राथमिक सूचनांसाठी फलकही इथं उपलब्ध आहेत,’ अशी माहिती आलम यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या