JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Recipe Video : पीठ न मळता, न लाटता बनवा गोलगोल, टम्मं फुगणारी चपाती; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत

Recipe Video : पीठ न मळता, न लाटता बनवा गोलगोल, टम्मं फुगणारी चपाती; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत

चपाती बनवण्याच्या सर्वात सोप्या पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : चपाती करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती फुगेल अशी शेकेपर्यंत, सर्वकाही एक कौशल्यच असतं. चपाती बनवताना सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे चपाती लाटणं. गोलगोल चपाती लाटणं सर्वांनाच जमत नाही. पण आता तुम्हाला चपाती गोलगोल लाटण्याची गरजच नाही. किंबहुना तुम्हाला कणीक मळण्याचीही गरज नाही. कारण पीठ न मळता, न लाटताही तुम्ही चपाती बनवू शकता, तीसुद्धा अगदी टम्म फुगणारी. सुरुवातीला चपाती बनवण्यास शिकताना अनेक समस्या येतात.  कधी पिठात पाणी जास्त होतं, कधी पीठ नीट मळलं जात नाही, कधी लाटताना चपातीचं पीठ पोळपाटाला चिकटतं आणि चपाती उचलताना ती फाटते. शेकवताना चपाती फुलत नाही, ती कडक होते किंवा कच्चीही राहते. अशा एक ना दोन कितीतरी तक्रारी आहेत. पण आता या सर्वाचं टेन्शनच नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी चपाती बनवण्याची सर्वात सोपी पद्धत घेऊन आलो आहोत.

सोशल मीडियावर रेसिपीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्ध शेफ आणि गृहिणीही रेसिपी शेअर करत असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेली ही चपाती बनवण्याची सोपी रेसिपी. तेलाची गरजच नाही, पाण्यातही तळता येतात पुऱ्या; कसं ते इथं पाहा Recipe Video आता तुम्हाला करायचं काय आहे, तर गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडंथोडं पाणी टाकून ते पातळ करायचं आहे. अगदी तसंच जसं आपण भजी, डोशासाठी पीठ बनवतो तसं. आता गॅसवर तवा ठेवून तो तापल्यावर गव्हाचं पातळ केलेलं पीठ एका खोल अशा चमच्यात घेऊन ते तव्यावर गोलाकार पसरवायचं आहे. अगदी तसंच जसा आपण डोसा बनवतो. पण ते फार जाड आणि फार पातळही पसरवू नये. आता दोन्ही बाजूने ते नीट शेकवून घ्या. थोड्या वेळाने तुम्ही पाहाल तर चपाती फुलताना दिसेल. अगदी तशीच जशी आपण लाटून शेकवल्यावर ती फुलते. ही चपाती सर्व बाजूने नीट शेकलीही जाते. आता यावर तुम्ही तेल लावू शकता. अबब! तब्बल 1.6 लाख रुपयांचा पिझ्झा; काय आहेत यात इतकं खास पाहा VIDEO ही चपाती अगदी कापसासारखही नरमही होते. चपाती पाहिल्यावर तुम्ही ती पीठ न मळता, न लाटता बनवली आहे, यावर कुणाचा विश्वासही बसणार नही.

सिम्पी मराठी युट्यूब चॅनेलवर ही रेसिपी दाखवण्यात आली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा करून पाहा आणि कशी झाली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या