JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ थालीपीठ कसं बनवायचं? पाहा गावाकडची रेसिपी

प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ थालीपीठ कसं बनवायचं? पाहा गावाकडची रेसिपी

रोज नाश्त्यामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलाय तर एकदा अस्सल गावरान पद्धतीचं थालपीठ ट्राय करा. पाहा रेसिपी..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 19 जुलै: थालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीडमधील गृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत. पौष्टिक थालीपीठ उत्तम आहार सध्याचा काळ हा फास्टफूडचा मानला जातो. अनेकजण नाश्त्यातही तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात. त्यांच्यासाठी अस्सल गावरान आणि पारंपरिक असणारे थालीपीठ एक चांगला पर्याय आहे. स्वादिष्ट आणि बनवायला सोपी असणारी थालीपीठाची रेसिपी आपण घरात सहज बनवू शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा पदार्थ पोषक आहे.

थालीपीठसाठी आवश्यक साहित्य गव्हाचे, ज्वारीचे व बाजरीचे असे प्रत्येकी 1 वाटी पीठ, थोडेसे बेसन, 1 चमचा धना पावडर, हळद, लाल तिखट (आपल्याला ज्याप्रमाणात तिखट हवे आहे तेवढे घ्यावे), मीठ चवीनुसार, यानंतर साधारण 1 वाटी भरून बारीक चिरलेला कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. Local Food: झटपट बनवा पौष्टिक धिरडं, पाहा गावाकडची सोपी रेसिपी थालीपीठ कसे बनवायचे संपूर्ण कृती थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम वरील प्रमाणे सर्व प्रकारचे पीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्या एकत्रित केलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा, धना पावडर, हळद, लाल तिखट व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या. त्यानंतर अंदाजाने पाणी घालून हे मिश्रण मळून घ्या. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही असे मध्यम स्वरूपात हे मळून घ्या. त्यानंतर हे पिठाचा गोळा हातावर घ्यावा व हातावर काही प्रमाणात तेल आणि थोडे पाणी लावावे. त्यानंतर तवा हलक्या प्रमाणात गरम झाल्यावर त्यावर थोडेसे तेल सोडावे व त्या तव्यावरच हे थालपीठ माखून घ्यावे. त्यानंतर 5 ते 7 मिनिट या थालपीठाला वाफू द्यावे आणि त्यानंतर दही ठेचा बरोबर गरमागरम थालपीठ खाऊ शकता. थालीपीठची ही रेसिपी सोपी असून आपण नक्की ट्राय करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या