JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डाळिंबाचं बिस्किट कधी पाहिलंय? नव्या संशोधनाचा होणार शेतकऱ्यांना फायदा, Video

डाळिंबाचं बिस्किट कधी पाहिलंय? नव्या संशोधनाचा होणार शेतकऱ्यांना फायदा, Video

तुम्ही आजवर डाळिंबचा ज्यूस पिला असेल, अथवा प्रत्यक्षात डाळिंब खाल्ली असतील. पण डाळिंबापासून चक्क बिस्किट बनते हे तुम्हाला माहिती आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 11 मार्च : तुम्ही आजवर डाळिंबचा ज्यूस पिला असेल, अथवा प्रत्यक्षात डाळिंब खाल्ली असतील. पण डाळिंबापासून चक्क बिस्किट बनते हे तुम्हाला माहिती आहे का? सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील डॉ. निलेश गायकवाड यांनी या प्रकराची बिस्किट तयार केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सात-आठ नवी उत्पादनं शोधून काढली आहेत. गायकवाड यांनी डाळिंबापासून वाईन.ज्यूस, सरबत ही मुख्य उत्पादन बनवली आहेत. त्याचबरोबर ज्यूस काढल्यानंतर राहिलेल्या बियांपासून डाळिंबाचे तेल काढले जाते. जागतिक दर्जाच्या जवळपास सर्वच सौंदर्यप्रसाधनात डाळिंबाचे तेल वापरले जाते. हे तेल काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यापासून चविष्ट बिस्कीट बनवली जातात. डाळिंबाच्या सालीपासून बनवण्यात येणारी पावडर ही साबनात तसंच दंतमंजनात वापली जाते. त्याचबरोबर इतर बियांपासून मुखवास म्हणजेच माऊथ फ्रेशनरही बनवली जातात. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुक्याचा काही भाग हा डाळिंबाच्या उत्पादनासाठी राज्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांनो, तृणधान्याची लागवड करा आणि मिळवा ‘या’ पद्धतीनं फायदा, Video अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे यंदा डाळिंबाचे उत्पादन घटलं आहे. पण युरोप आणि देशाबाहेरीर अनेक भागात सोलापूरच्या डाळिंबाची निर्यात होते. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूरमध्ये असून तेथील संशोधनाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय.

डाळिंबाचा एकही भाग वाया न घालविता  विविध उत्पादनं घेता आली तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान सहन करावं लागणार नाही. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड यांच्या परिश्रमामुळेच हे शक्य झालं आहे, अशी भावना या केंद्रातील अधिकारी महादेव गोगाव यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या