नुपूर पाटील, प्रतिनिधी ठाणे, 28 फेब्रुवारी : तरुणाईमध्ये फास्टफूडचे प्रचंड क्रेझ आहे. पिझ्झा, बर्गर, रोल्स खायला सगळ्यांनाच आवडतं त्यातल्या त्यात नॉन व्हेज असलं की मस्तच! ठाण्यातील एका तरुणानं स्पेशल नॉन व्हेज बर्गर आणि रोल्सची विक्री सुरू केली आहे. सर्वसमान्यांना परवडेल अशा दरामध्ये तो इथं बर्गरची विक्री करतो. त्यामुळे त्याचा स्टॉल आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. निलेश पालवणकर असं या उद्योजक तरुणाचं नावं असून त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्यानं एका कॅफेत काम केले आहे. या कामाच्या दरम्यानच निलेशला ‘स्नॅक्स ऑन व्हिल्स’ची कल्पना सुचली. त्यानं एका लहानश्या गाडीवर सर्व पदार्थ आणि साहित्य मांडलं. त्यावर फक्त नॉनव्हेज बर्गर आणि रोल्सची विक्री सुरू केली. त्याच्या या कामात त्याला घरच्यांनीही मोठी मदत केली. ग्राहकांना कमी पैशांमध्ये क्वालिटी फूड देण्यावर निलेशचा भर आहे. त्याच्या लहानशा गाडीवर स्वच्छता आणि नीटनीटकेपणा पाहायला मिळतो. बर्गर तयार करताना त्यात असलेली पॅटी बनवण्याची पद्धत सुद्धा अगदी मोठ्या कॅफेसारखीच आहे. आपल्यासमोर सगळे पदार्थ बनवले जातात. डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली कोल्हापुरी डिश, 18 वर्षांपासून सुपरहिट! Video कोणते पदार्थ मिळतात? या स्टॉलवर चिकन पाव, चिकन बर्गर, चिकन चीज बर्गर, एग चीज बर्गर आणि विविध प्रकारचे चिकन रोल्स मिळतात.
किती आहे किंमत? 30 रुपयांपासून 90 रुपयांपर्यंत हे पदार्थ निलेशच्या दुकानात मिळतात. खरं तर ज्या भागामध्ये त्याच स्नॅक ऑन व्हिल्स आहे. त्या भागात सामान्य लोकं राहतात ज्यांना हेच पदार्थ मोठ्या कॅफे मध्ये जाऊन खाणं परवडत नाही म्हणूनच कॅफेच्या पद्धतीनेच हे पदार्थ बनवून विक्री करतो.
एकाच ठिकाणी मिळतात अंड्यापासून बनवलेले तब्बल 70 पदार्थ! पाहा Video
गूगल मॅपवरून साभार
स्नॅक्स ऑन व्हिल्स हे दुकान कुठे आहे? स्नॅक्स ऑन व्हिल्स हे दुकान ठाण्यातील ढोकळीनाका येथे आहे.