बीड, 4 जुलै: आजकाल फास्ट फूड खाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वडापाव, भजे, पॅटीस, सँडविच, बर्गर, पिझ्झा अशा पदार्थांच्या गाड्यावर नेहमीच गर्दी दिसते. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढतोय. बीडमधील हॉटेल कामगार असणाऱ्या भारत गनगे यांनी 20 वर्षांपूर्वी वडापावचा गाडा सुरू केला. वडापावला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. पण गाड्यावर सहज बनवलेल्या एका पॅटीसनं ग्राहकांच्या तोंडाला पाणी सुटलं. आता याच पॅटीस विक्रीतून ते लाखोंची कमाई करत आहेत. वडापावला प्रतिसाद कमी गाव, शहर आणि जिल्हा बदललं की तिथली भाषा आणि खाद्य संस्कृती ही बदलत असते. परंतु, अलिकडे वडापाव आणि इतर फास्टफूड सर्वच ठिकाणी प्रसिद्ध आहे. बीड शहरातील भारत गनगे हे हॉटेल कामगार होते. त्यांनी 1998 मध्ये बार्शी नाका परिसरामध्ये एका छोट्या गाड्यावर वडापावचा व्यवसाय सुरू केला. मात्र वडापावला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. गाड्यावरच ते विविध प्रयोग करत होते.
एक प्रयोग ठरला हिट भारत यांनी एकदा घरच्या घरीच पावांमध्ये भाजी भरून हावडा डाळीच्या पिठामध्ये तळला. त्याची चव त्यांनी चाखली तर अप्रतिम लागली. त्यानंतर त्यांनी हे पॅटीस मित्र परिवारालाही खायला दिले. सर्वांनाच ही चव आवडली. मग वडापावसोबत त्यांनी पॅटीस बनवायला सुरुवात केली. लोकांना याची चव आवडू लागली आणि लोक भारत यांच्या गाड्यावर गर्दी करू लागले. दिवसाला 500 प्लेटची विक्री 1998 साली दीड रुपये असा या पॅटीसच्या प्लेटचा दर होता. आता दहा रुपये प्रति प्लेट असा दर आहे. या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा दिवसाकाठी 50 ते 100 प्लेटची विक्री होत होती. आता 500 ते 600 प्लेटची दिवसाकाठी विक्री होते. पूर्वी मिळणारी चव आम्ही कायम ठेवली आहे. हे सर्व यासाठी लागणारे पदार्थ घरगुती पद्धतीने तयार करतो. त्यामुळे ग्राहक आवर्जून या ठिकाणी पॅटीस खाण्यासाठी येतात, असे भारत गनगे सांगतात. आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि हिरवी चटणी, एकदा खाल तर विसरून जाल कसा तयार होतो पॅटीस? बटाटे उकडून त्यात घरगुती पद्धतीने तयार केलेली लाल मिरचीचा काळा मसाला, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली जाते. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करतात त्यानंतर पावामध्ये ह्या बटाट्याचं मिश्रण भरून डाळीच्या पिठामध्ये तळला जातो. यासोबत गावरान तिखट मिरची देखील दिली जाते. हा पॅटीस अधिकच चवदार लागतो आणि ग्राहकांना आकर्षित करतो.