JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पाव नव्हे ब्रेडसोबत कधी खाल्ली का पुण्यातील ही झणझणीत मिसळ, 73 वर्षांपासून एकच नंबर!

पाव नव्हे ब्रेडसोबत कधी खाल्ली का पुण्यातील ही झणझणीत मिसळ, 73 वर्षांपासून एकच नंबर!

अनेक पिढ्या बदलल्या पण पुणेकरांच्या आवडत्या मिसळीची चव तशीच आहे. 73 वर्षांपासून ही मिसळ नंबर 1 आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 24 जुलै : पुण्याची मिसळ चांगली की नाशिकची ? हा वाद मिसळप्रेमींमध्ये नेहमी रंगत असतो.  या दोन्ही शहरात मिसळीसाठी फेमस अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूनं जोरदार युक्तीवाद केले जातात. पुण्यातील मिसळप्रेमींमध्ये गेल्या 73 वर्षांपासून एक नाव लोकप्रिय आहे. या कालावधीत पुणे बदललं. अनेक पिढ्या बदलल्या पण पुणेकरांच्या आवडत्या मिसळीची चव तशीच आहे. नारायण पेठेतील एका लहान गल्लीत असलेलं हे दुकान प्रत्येक पुणेकर मिसळप्रेमीला माहिती आहे. 73 वर्षांची परंपरा आम्ही हे सर्व कोणत्या मिसळीबाबत म्हणत आहोत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पुणे शहरात ‘बेडेकर मिसळ’ हे सर्वात जुनं दुकान आहे.  मूळचे कोकणातले असलेल्या दत्तात्रय बेडेकर यांनी 1948 साली हे दुकान सुरू केले. सुरुवातीला फक्त चहापासून सुरू केलेल्या ‘बेडेकर’मध्ये हळूहळू घरगुती नाश्त्याचे पदार्थसुद्धा मिळू लागले. त्यापैकीच एक मिसळ. पुढे ही मिसळच बेडेकरची ओळख झाली. या मिसळला पुणेकरांची प्रचंड पसंती मिळाली. गेली अनेक वर्षे ही बेडेकर मिसळ पुणेकरांच्या मनात घर करून बसली आहे.

कशी तयार होते मिसळ? बेडेकरांकडं एका खास पद्धतीने मिसळ तयार केली जाते. चिवड्यापासून कोरडं मिश्रण तयार केले जाते. ‘व्हाईट ब्रेड’ चे दोन काप आणि लिंबाच्या फोडीसोबत ही मिसळ सर्व्ह केली जाते. इथे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तर्री मिळतात. मसालेदार आणि तिखट चवीच्या विशिष्ट प्रमाणावरून हे प्रकार ठरतात. प्रत्येकाच्या पसंतीनुसार ग्राहक या तर्रीचा आस्वाद घेतात. ‘बेडेकर’ची तर्री ही कांदे, टोमॅटो, बटाटे आणि दुधीभोपळा अशा भाज्यांपासून बनवली जाते. तिचे वेगळेपण म्हणजे ती चवीला तिखटगोड असते. बीटचा पराठा कधी खाल्लाय का? पाहा सोपी रेसिपी Video मिसळीव्यतिरिक्त ‘स्पेशल चहा’, कांदा भजी यांसारखे अन्य पदार्थही येथे उपलब्ध आहेत. येथील गुलकंद, अळीव आणि शेंगदाणा हे तीन प्रकारचे लाडू फेमस आहेत. त्याचबरोबर चिरोटा आणि खरवस  हे दुर्मीळ महाराष्ट्रीयन पदार्थही येथे मिळतात. सकाळी 7 वाजता दुकान उघडल्यापासून दुकानाबाहेर मिसळप्रेमींची रांग लागते. आता या कुटुंबीयांची तिसरी पिढी या व्यवसायात लक्ष घालत आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण चवीमुळे त्यांनी पुणेकरांची आवडती मिसळ होण्याचा मान मिळवलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या