JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीच्या उपवासाला भगर घेताय? आधी हे पाहा

Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीच्या उपवासाला भगर घेताय? आधी हे पाहा

आषाढी वारीदिवशी महाराष्ट्रातील बहुतांश लोक एकादशीचा उपवास करतात. फराळासाठी भगर खरेदी करण्यापूर्वी ही बातमी पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 28 जून: आषाढी वारीनिमित्त पंढरीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील लाखो लोक उपवास करत असतात. फराळासाठी फळांसोबतच शाबू आणि भगर यांना मोठी मागणी असते. मात्र, हे खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा आपल्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे भगर खरेदी करताना काय काळजी घ्यावी? याबाबत बीडचे अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त इमरान हाशमी यांनी माहिती दिली आहे. भेसळ धोकादायक एकादशीच्या उपवासानिमित्त भगर, शाबूदाणा, खजूर यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. सध्या बाजारपेठेत त्यासाठी गर्दी दिसतेय. काही ठिकाणी उपवासाचे अनेक पदार्थ पॅकिंग नसून खुली विक्री केली जातेय. त्यामुळे विषबाधे सारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

बीडमध्ये भगरीतून विषबाधेचे प्रकार जिल्ह्यात मागील काही दिवसांत विशेषत: भगर खाल्ल्यानंतर विषबाधा होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक गावात लोकांना विषबाधा होऊन उलटी, मळमळ, पोटदुखी असा त्रास जाणवला होता. त्यामुळे आता औषध प्रशासनाने दिलेल्या नियमानुसारच भगर यासह उपासाचे पदार्थ खरेदी करावे, असे आवाहन केले जातेय. खरेदी करताना ही घ्या काळजी भगर, साबुदाणा, खाद्यतेल, खरेदी करताना ते पॅक बंद असल्याची खात्री करा. अन्नपदार्थाच्या पॅकेटवर उत्पादनाचे नाव लेबल नसल्यास ते खरेदी करू नका. उत्पादनाचा दिनांक व एक्सपायरी डेट तपासून घ्या. भगरीचे खुले पीठ बाजारातून विकत घेऊ नये. आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि हिरवी चटणी, एकदा खाल तर विसरून जाल पदार्थ तयार करतानाही घ्या काळजी भगर, शाबूपासून तयार केलेले पदार्थ झाकून ठेवा. माती, माशा, मुंग्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्या. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका. तसेच अन्नपदार्थांचा खरेदी बिल तपशील व्यवस्थित ठेवा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने केल्या आहेत. तर त्वरीत संपर्क साधा जिल्ह्यात काही प्रमाणात भगरीतून विषबाधा होण्याचे प्रकार होतात. यामुळे खराब आणि खुली भगर खरेदी करू नये. ही आरोग्यास हानिकारक ठरू शकते. जरी अशा कुठल्याही खुल्या उपासाच्या पदार्थाची विक्री होत असेल तर त्वरित अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधा, असे आवाहन हाशमी यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या