JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Father's Day 2020 : वडिलांबरोबरचा बेस्ट सेल्फी करा शेअर; टीव्हीवर झळकायची मिळेल संधी

Father's Day 2020 : वडिलांबरोबरचा बेस्ट सेल्फी करा शेअर; टीव्हीवर झळकायची मिळेल संधी

जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Father’s Day साजरा होतो. तुमच्या वडिलांबद्दलच्या भावना शेअर करायला आम्ही हे ऑनलाईन व्यासपीठ देत आहोत. बेस्ट फोटोला मिळेल News18lokmat वर स्थान

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : वडिलांप्रती असलेल्या प्रेमभावना, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे Father’s Day. फादर्स डे 1910 पासून साजरा होतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचं स्थान महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला त्या भावना वडिलांपर्यंत पोहोचवता येतात, असं नाही. त्यासाठी असतो हा खास दिवस. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Father’s Day साजरा होतो. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. तुम्हालाही आपल्या पित्याप्रतीच्या भावना, आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी News18lokmat.com व्यासपीठ देत आहे. तुमचा वडिलांबरोबरचा बेस्ट फोटो शेअर करा. बेस्ट सेल्फी इथे अपलोड करा आणि त्यासोबत लिहा तुम्हाला घडयला मदत केलेला वडिलांनी दिलेला एक धडा. वडिलांशी शिकवण आमच्याबरोबर शेअर करा. त्यासाठी या Father’s day च्या लिंकवर क्लिक करा. सर्वोत्तम संदेश आणि सर्वोत्तम सेल्फीला आमच्याकडून प्रसिद्धी मिळेलच. शिवाय News18lokmat टीव्हीवर झळकायची संधीही मिळेल. ‘फादर्स डे’ हा सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टन येथे साजरा करण्यात आला अशी मान्यता आहे. हा दिवस साजरा करण्यामागे सोनोरा लुईस स्मार्ट डॉड या महिलेचा 62 वर्षांचा संघर्ष आहे. याशिवाय इतरही अनेक सेलेब्रिटी वडील, आयुष्यातला ‘बाप माणूस’, सेलेब्रिटी मुलांचे संघर्ष, वडिलांची शिकवण आणि त्यासंबंधीचे लेख आणि फोटो या लिंकवर पाहायला मिळतील. वाचा Miss You: ‘या’ क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण… मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण! बाप तो बाप होता है! बॉलिवूडचे सुपर कूल डॅडी ज्यांनी मुलांना दिलं सर्वोत्तम गिफ्ट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या