यात सगळ्यात प्रथम येतो तो मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 1999 वर्ल्ड कपनंतर सचिनच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या वडिलांना अखेरचं पाहण्यासाठी सचिन इंग्लंडवरून आला आणि तीन दिवसांनी पुन्हा मैदानावर परतला. मैदानावर येताच त्यानं शतकी खेळी. यानंतर त्यानं आकाशाकडे बघून आपल्या बाबांना ही खेळी समर्पित केली.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या कारर्किदीच्या सर्वोत्तम शिखरावर आहे. मात्र त्याचं हे यश पाहण्याआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. क्रिकेट सामना सुरू असतानाच बाबांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा तो कोसळला गेला. मात्र त्यानंतर मैदानात परतल्यावर त्यांनं अशी काही खेळी की आजही सर्वांच्या लक्षात आहे.