इअरफोनचा अतिवापर ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
भीलवाडा, 13 जून : अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण सध्या मार्केटमध्ये आली असून त्यांच्या वापराने बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. सध्या ब्लूटूथ हेडसेटचा ट्रेंड असून बरेचजण याचा दैनंदिन जीवनात वापर करत असतात. पण या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर करणे आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. तेव्हा डॉक्टरांकडून या उपकरणांच्या सततच्या वापरामुळे शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेऊयात. भिलवाडा जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ घनश्याम चावला यांच्या मते, आजचे तरुण इअरफोन, ब्लूटूथ हेडसेट इत्यादी गॅजेट्सचा अति वापर करत आहेत, त्यामुळे त्यांच्या कानात अनेक समस्या निर्माण होतात. नवीन तंत्रज्ञान हे लोकांच्या उपयोगी ठरत असेल तरी त्यांचा अतिवापर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्याचप्रमाणे, ब्लूटूथ इअरफोन देखील आहेत. फ्लेवर्ड हुक्का पितायं? मग सावधान, तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर जर एखाद्या व्यक्ती त्याच्या कानात इअरफोन घालून मोठ्या आवाजात गाणी किंवा संगीत ऐकत असेल तर नक्कीच त्याच्या कानांना याचा त्रास होईल. अशा स्थितीत कानाचा पडदा फाटण्याची शक्यता देखील असते. यासोबतच मानवी मनातील मज्जासंस्थेमध्येही समस्या उद्भवू शकतात. यामुळे हळूहळू माणसाची ऐकण्याची क्षमताही कमी होत जाते.
सीएमएचओ चावला यांनी असेही सांगितले की, मोबाईलमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी मानवी मनासाठीही घातक ठरू शकते. पण माणूस त्यांचा विचार न करता मोठ्या आवाजात संगीत ऐकतो. त्याचा परिणाम लगेच दिसून येत नसला तरी काही काळाने त्याचे शरीरावर झालेले परिणाम दिसू शकतात. अनेकदा रस्त्यावर चालताना कानात इअरफोन घालून चालल्याने बरेचजण अपघाताला बळी पडतात. तेव्हा लोकांनी वेळीच इअरफोन्स वापरण्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याचा वापर कमी आणि आवश्यक तितकाच करावा.