मुंबई, 27 जानेवारी : पुरुष बाहेर कितीही मोठा बॉस असला तरी घरात एकच बॉस ती म्हणजे बायको (Wife). ही काळ्या दगडावरची रेखच आहे. अगदी प्रसिद्ध व्यक्तींचंही आपल्या बायकोसमोर काहीच चालत नाही. त्यातही बायकोपासून एखादी गोष्ट लपवली किंवा तिला न विचारता केली. त्याची खबर तिला कुठून तरी मिळाली मग काही त्या नवऱ्याची (husband) खैर नाही. असाच एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये एका प्रसिद्ध डॉक्टरानं (doctor) बायकोला सोबत न घेता कोरोना लस (corona vaccine) घेतली आणि मग त्या डॉक्टरला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं ते तुम्हीच पाहा. IFS ऑफिसर दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रसिद्ध डॉ. के. के. अग्रवाल यांचा हा व्हिडीओ आहे. ज्यांनी बायकोला न सांगता, तिला सोबत न घेता कोरोना लस घेतली आणि मग काय त्यांच्या डोक्याला तापच झाला.
व्हिडीओत पाहू शकता डॉक्टर कोरोना लशीबाबतच लाइव्ह सेशन करत आहेत. लाइव्ह सुरू असतानाच त्यांना त्यांच्या बायकोचा फोन येतो. फोनच्या पलीकडून त्यांची बायको काय बोलते आहे हे स्पष्टपणे ऐकायलाही येत आहे. त्यांची बायको त्यांनी कोरोना लस घेतली म्हणून झाप झाप झापते आहे. हे वाचा - कॅन्सरग्रस्त लेकीसाठी आईनं काय केलं पाहाल; VIDEO पाहून फुटेल अश्रूंचा बांध डॉ. अग्रवाल यांनी बायकोला न सांगता आणि तिला सोबत न नेता कोरोना लस घेतली आणि याची खबर त्यांच्या बायकोपर्यंत पोहोचली. त्यांचा लाइव्ह व्हिडीओ सुरू असतानाच त्यांच्या बायकोनं फोन करून याबाबत जाब विचारला आणि डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉक्टर आपल्या बायकोला मनवण्याचाही प्रयत्न करत आहेत. ‘आपण लस घ्यायला गेलो नव्हतो, माहिती घ्यायला गेलो होतो. पण डॉक्टरांनी मला लस घ्यायला सांगितली मी घेतली’, असं डॉक्टरांनी त्यांच्या बायकोला सांगितलं. तरी त्यांची बायको त्यांचं काहीच ऐकायला तयार नाही. हे वाचा - Shocking! मासेमारी करताना शार्कच्या जबड्यात गेली बोट; पुढे काय झालं पाहा VIDEO डॉक्टरांची बायको त्यांचं एक न ऐकता एकटीच बडबडत जाते. नवऱ्यानं दिलेलं कारणही तिला खोटं वाटतं. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका, असंच ती म्हणते. नंतर डॉक्टर तिला लाइव्ह असल्याचं सांगत फोन कट करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.