कॅन्सरग्रस्त लेकीसाठी आईनं काय केलं पाहाल; VIDEO पाहून फुटेल अश्रूंचा बांध

कॅन्सरग्रस्त लेकीसाठी आईनं काय केलं पाहाल; VIDEO पाहून फुटेल अश्रूंचा बांध

कॅन्सरशी (Cancer) झुंजण्याऱ्या आपल्या लेकीच्या वेदना पाहून एक आई (Mother) काय करू शकते, याची तुम्ही कल्पनाही करणार नाही ते या आईनं केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : आई (mother) जी आपल्या मुलांच्या आनंदातच नाही तर त्यांच्या दुःखातही सोबत असते. किंबहुना मुलांसमोर ती ढाल बनून उभी राहते आणि त्यांच्यावर कोसळणारं दुःख, त्यांच्यावर ओढावणारी संकटं ती स्वतः पेलते. मुलांना साधी छोटीशी जखमही ती होऊ देत नाही. मग ती शारीरिक असो किंवा मानसिक. आईकडे मुलांच्या प्रत्येक जखमेवर औषध असतं. आपल्या मायेची फुंकर ती या जखमेवर घालते. मुलांच्या वेदना ती स्वतः सहन करते. असाच एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. जिथं कॅन्सरशी (cancer) झुंज देणाऱ्या लेकीसाठी एक आई काय करू शकते, हे दिसून येतं. हा व्हिडीओ पाहून कठोरातील कठोर हृदयालाही पाझर फुटेल आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतील.

सोशल मीडियावर आपल्या कॅन्सरग्रस्त लेकीचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. रॅक्स चॅपमॅननं आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आई आपल्या मुलीला सरप्राइझ देते आहे. तिची मुलगी कॅन्सरशी लढते आहे. प्रेम. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

कॅन्सरशी झुंजण्याऱ्या आपल्या लेकीच्या वेदना पाहून एक आई काय करू शकते, याची तुम्ही कल्पनाही करणार नाही ते या आईनं केलं आहे. व्हिडीओत पाहू शकता.

कॅन्सरवर उपचार घेत असताना केमोथेरेपीमुळे केसांवर त्याचा दुष्परिणाम होतो. केस गळू लागतात आणि टक्कलही पडलं. त्यामुळे केस काढले जातात. व्हिडीओत एक महिला एका तरुणीचे केस काढताना दिसते आहे. या तरुणीला कॅन्सर आहे आणि केस कापणारी महिला दुसरी तिसरी कुणी नसून ती त्या तरुणीची आई आहे.

हे वाचा - 'मै टकलू हो जाऊंगा' चिमुकल्याचा केस कापतानाचा क्यूट व्हिडीओ पुन्हा VIRAL

आपल्या मुलीचे ती हसत हसत केस कापते, मुलीच्या चेहऱ्यावरही त्याचं दुःख नाही. म्हणजे कॅन्सरशी हिमतीनं लढायचं हे तिनं ठरवलंच आहे. तिची आई तिला या लढ्यात साथ देते आहे. पण फक्त बोलण्यापुरतं नाही. तर आपल्या कॅन्सरग्रस्त मुलीला होणाऱ्या वेदना शक्य तितक्या स्वतःही सहन करण्याचा ती प्रयत्न करते.

त्यामुळे व्हिडीओ तुम्ही पुढे पाहाल तेव्हा आपल्या मुलीच्या निम्म्या डोक्यावरील पूर्ण केस काढल्यानंतर ही आई आपल्या केसांवरूनही रेझर फिरवते. मुलीप्रमाणे ती आपले केसही काढून टाकते. मुलीसाठी हा धक्काच होता. आईला जेव्हा ती असं करताना पाहते तेव्हा ती शॉक होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आईला ती असं का करते म्हणून विचारतेही पण आई तिला गप्प करते, तिलाही रडू कोसळतं. रडत आपल्या मुलीचं काहीच न ऐकता ती केस कापत राहते.

हे वाचा - Shocking! मासेमारी करताना शार्कच्या जबड्यात गेली बोट; पुढे काय झालं पाहा VIDEO

हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. जो पाहताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं आहे. आईच्या प्रेमाला उपमा नाहीच. हे या व्हिडीओतूनही दिसून येतं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 27, 2021, 7:10 PM IST

ताज्या बातम्या