Shocking! मासेमारी करता करता शार्कच्या जबड्यात गेली बोट; पुढे काय झालं पाहा VIDEO

Shocking! मासेमारी करता करता शार्कच्या जबड्यात गेली बोट; पुढे काय झालं पाहा VIDEO

एखाद्या फिल्ममधील वाटावा असं हा सीन प्रत्यक्षात घडला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल.

  • Share this:

फ्लोरिडा, 27 जानेवारी : मासेमारी (fishing) करता करता एखादा अवाढव्या मासा (fish) जाळ्यात सापडल्याचं अनेकदा पाहिलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर (social media) असा व्हिडीओ (video) व्हायरल (viral) होतो आहे, ज्यामध्ये मासेमारी करता करता जाळ्यात मासे सापडणं तर दूर पण मासेमारीसाठी गेलेली बोटच शार्कच्या (shark) जबड्यात गेली. हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

बोटीतून प्रवास करताना शार्कच्या जबड्यात ती बोट अडकल्याचं तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण अशी फिल्मी स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. फ्लोरिडातील हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. एरिका एलमंड  (Erika Almond) ने आपल्या फेसबुकवर (facebook) हा व्हिडीओ शेअर केला आहे. जिनं हा सर्व थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे.

फ्लोरिडातल्या टाम्पा खाडीतील (Tampa Bay in Florida) हा व्हिडीओ आहे. एनडीटीव्हीनं डेली मेल रिपोर्टच्या हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार एलमंड काही मित्रांसोबत मासेमारी करायला गेली. ऑफशोर थेरेपी बोटीवर ती होती. मासेमारी करता करता अचानक त्यांची बोट खतरकनाक अशा व्हाइट शार्कच्या (great white shark)  जबड्यात गेली.  व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हे वाचा - पावसाचे थेंब पकडण्यासाठी धडपड; निरागस मुक्या जिवाचा VIDEO VIRAL

एलिकानं फॉक्स 13 टाम्पा बे (Fox 13 Tampa Bay) ला सांगितलं, जेव्हा अचानक एक विशाल शार्क आमच्या बोटीजवळ आली आणि  बोटीचा एक भाग आपल्या जबड्यात धरलं, तेव्हा आमचा श्वासच थांबला. जेव्हा तुम्ही मासे पकडत असता आणि शार्क येऊ शकते, असं तुम्हाला वाटणं हे असामान्य नाही. पण हे खूप अनोखं होतं. जवळपास 14 ते 16 फूट मोठी पांढरी शार्क अचानक आमच्या समोर आली. हे आम्ही काय पाहत आहोत, यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. हे दृश्यं आमच्यासाठी अद्भूत होतं. तुमच्यासोबत काय होणार आहे हे तुम्हाला कधीच आधीपासून माहिती नसतं.

हे वाचा - याला म्हणताच जशाच तसं! घोड्याला नाचवणाऱ्या मालकाचं काय झालं पाहा VIDEO

पांढरी शार्क हा सर्वात मोठा शिकारी मासा आहे. एलमंडचा मित्र टायलर लेवेस्क ही बोट चालवत होता. त्यानं शार्कला दूर पळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच शार्कनं बोटीचा काही भाग तोडला होता.

Published by: Priya Lad
First published: January 27, 2021, 5:58 PM IST

ताज्या बातम्या