JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Care Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? या आजारांचा धोका असू शकतो

Health Care Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? या आजारांचा धोका असू शकतो

तहानच्या भावनेतून आपलं शरीर पाण्याच्या गरजेचा संदेश देत असतं. कमी पाणी पिणं जसं शरीरासाठी अपायकारक आहे, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं अयोग्य आहे. काही लोक तहान न लागताही सतत पाणी पीत राहतात.

जाहिरात

जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाच्या दरम्यान आवश्यक असल्यास, एक किंवा दोन घोट पाणी प्या. याशिवाय पाणी सामान्य तापमानाचे किंवा कोमट असावे. फ्रीजचे थंड पाणी पिऊ नका. तसेच, पाणी घोट-घोट घेऊन पिणे हे अमृतसारखे आहे असे म्हटले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30नोव्हेंबर : जास्तीत-जास्त पाणी पिणं (Drinking Water) आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आपण ऐकत आलो आहोत. प्रौढ व्यक्तीनं दिवसभरात साडेतीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होतं, तसेच पाणी आपल्याला इतर अनेक आजारांपासून दूर ठेवते. याच पाण्याचं प्रमाण शरीरात असंतुलित झाल्यास जीवावरचं संकट निर्माण होऊ शकतं. तहानच्या भावनेतून आपलं शरीर पाण्याच्या गरजेचा संदेश देत असतं. कमी पाणी पिणं जसं शरीरासाठी अपायकारक आहे, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं अयोग्य आहे. काही लोक तहान न लागताही सतत पाणी पीत राहतात. असं करणं गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. चला जाणून घेऊया जास्त पाणी प्यायल्यानं तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात. मधुमेह (diabetes) हल्ली मधुमेहाचा आजार प्रत्येक वयोगटात झपाट्यानं पसरताना दिसत आहे. सर्व वयोगटातील लोकांना ज्या प्रकारे हा आजार होत आहे, त्यामागे वाईट जीवनशैली हे कारण आहे. यासोबतच वारंवार तहान लागणं हे मधुमेहाचं प्रमुख लक्षण आहे. मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं. जे किडनी सहज फिल्टर करू शकत नाही. त्यामुळं पाण्याअभावी वारंवार तहान लागते. हे वाचा -  cancer : कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष अपचन (Indigestion) अनेक वेळा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर ते सहजासहजी पचत नाहीत. भरपूर प्रमाणातील आणि मसालेदार अन्न पचवण्यासाठी शरीराला जास्त पाणी पिण्याची गरज असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि हे जास्त तहान लागण्याचं कारण बनतं. भरपूर घाम येणं (sweating) शरीराला जास्त घाम येऊ लागला तरीही शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. अशा स्थितीत आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळं आपल्याला जास्त तहान लागते. हे वाचा -  खतरनाक Paanipuri! फक्त एक Golgappa खाऊन तरुणाची अवस्था भयंकर झाली चिंता (Anxiety) बेचैनी, घबराट, अस्वस्थता आणि चिंतेमुळे तोंड कोरडं पडू लागतं. त्यामुळं व्यक्ती जास्त पाणी पिते. अशा स्थितीत काही एन्झाईम्स तोंडात तयार होणाऱ्या लाळेचं प्रमाणही कमी करतात. त्यामुळं वारंवार तहान लागते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या