मुंबई, 20 ऑक्टोबर : दिवाळी आता तोंडावर आलीय. सर्वांची सर्व तयारी तर झाली असेलच. म्हणजे कपडे, सजावटीचं सामान, पणत्या, लायटिंग, आकाशकंदील आणि रांगोळी ची तयारी… रांगोळीची सर्व तयारी झालीय ना? म्हणजे रंग तर सर्वांनी आणलेच असतील. पण रांगोळी सहज, सोपी आणि सुंदर बनवणारे रांगोळीचे टूल्स.. त्याची तयारी झालीये? झाली असेल तर उत्तम मात्र झाली नसेल तरीही टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला घराच्या घरी टाकाऊ साहित्यापासून रांगोळीचे टूल्स कसे बनवायचे याबद्दल माहिती देणार आहोत. रांगोळी काढायची म्हणलं की, बऱ्याच लोकांना टेन्शन येतं. कारण सर्वांनाच रांगोळी येते असे नाही. मग अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स त्यासाठी वापरतात. मात्र हे टूल्स बाजारात बरेच महाग मिळतात. पण एक रुपयाही खर्च न करता हे टूल्स बनवू शकता. युट्युबवर पुणेरी तडका या चॅनेलवर हे रांगोळीचे टूल्स कसे बनवायचे ते दाखवले आहेत.
Pune : दिवाळीची खरेदी करण्यासाठी ‘हे’ आहेत 5 बेस्ट पर्याय, Videoरांगोळी टूल्स बनवण्यासाठी वापरा घरातील या वस्तू पाण्याची बॉटल तेलाची बॉटल फेव्हीकॉलची बॉटल सॅनिटायझरची बॉटल नोझल असलेली कोणतीही बॉटल पेपर कप
चमचा मार्कर पेन औषधाच्या बॉटलचे झाकण नेटचा कपडा चहा गाळणी खराब झंक्सालेला पेन प्लॅस्टिक डब्याची झाकणं पेन्सिल
वरील या सर्व वस्तूंचा वापर तुम्ही रांगोलीच्छे टूल म्हणून करू शकता. या तुळशीच्या साहाय्याने तुम्ही सहज रांगोळीच्या डिझाइन्स बनवू शकता. यामुळे तुमचा वेळी वाचेल आणि तुमची रांगोळी अगदी रेखीव आणि सुंदर दिसेल. या टूल्सचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे डिझाईन बनवू शकता, याचीही कल्पना या व्हिडिओमध्ये दिली गेली आहे.