नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व (Diwali 2021 Puja) आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते. यावर्षी कार्तिक अमावस्या 04 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी आहे. देवी लक्ष्मी (Lakshmi) आणि भगवान गणेश, कुबेर, संपत्तीची देवता, देवी काली आणि देवी सरस्वती यांचीही दिवाळीत पूजा केली जाते. पण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केली जात नाही. या सर्व देवतांच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूची पूजा का केली जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया दिवाळीच्या रात्री भगवान विष्णूशिवाय लक्ष्मीपूजन का केलं जातं. म्हणून विष्णूची पूजा केली जात नाही खरे तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीसोबत अनेक देवदेवतांची पूजा केली जाते, परंतु त्या रात्री भगवान श्री हरिची पूजा करण्याची प्रथा नाही. यामागे एक खास कारण आहे. दिवाळी हा सण चातुर्मासाच्या दरम्यान येतो. आणि असे मानले जाते की, या काळात भगवान विष्णू हे योग निद्रामध्ये लीन राहतात. त्याचमुळे कोणत्याही धार्मिक कार्यात त्यांची अनुपस्थिती स्वाभाविक आहे आणि हेच कारण आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी दिवाळीला भगवान विष्णूशिवाय पृथ्वीतलावर येते आणि घरी इतर देवतांसह देवीची पूजा केली जाते. हे वाचा - Diwali Vacation: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करतायत? ‘ही’ आहेत बजेट डेस्टिनेशन्स या दिवशी श्रीहरी येतात असे मानले जाते की दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. वास्तविक, भगवान विष्णू चातुर्मासात निद्रिस्त राहतात आणि दिवाळीनंतर देवूथनी एकादशीलाच जागे होतात. चातुर्मासात दिवाळी येत असल्याने त्यांची झोप भंग होत नाही, त्यामुळे दिवाळीला त्यांचे आवाहन व पूजा केली जात नाही. देव दीपावली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते, जेव्हा भगवान विष्णू झोपेतून जागे होतात. या दिवशी मंदिरांमध्ये खूप सजावट केली जाते. ( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत त्याची हमी देत नाही.)